नागपूर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चार ठार

नागपूर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चार ठार

नागपूर-औरंगाबाद महामार्गावर घुईखेड गावाजवळ कार आणि ट्रकची सामोरासमोर भीषण धडक झाली. यात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे

  • Share this:

अमरावती, 18 ऑगस्ट- नागपूर-औरंगाबाद महामार्गावर घुईखेड गावाजवळ कार आणि ट्रकची सामोरासमोर भीषण धडक झाली. यात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. दोघांचा जागेवरच तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तळेगाव दशासर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी (18 ऑगस्ट) दुपारी ही घटना घडली.

मिळालेली माहिती अशी की, चांदूर रेल्वे तालुक्यातील धोत्रा येथील मुळचे असलेले आणि सध्या नागपुरमधील गोटाळ पांझरी, कस्तुरी नगर येथे वास्तव्यास असलेले अनिल सारंगधर चेंडकापुरे हे रविवारी आई, पत्नी व मुलासोबत नागपुरहून कारने (एमएच 49 यु 3409) मुळगावी जावळा (धोत्रा) येथे निघाले होते. घुईखेडजवळील खारवगळ नाल्याजवळ समोरून येणारा ट्रक (एमएच 17 बीडी 9743) आणि अनिल चेंडकापुरे यांच्या कारची समोरासमोर धडक झाली. यामध्ये कार चालवत असलेले अनिल सारंगधर चेंडकापुरे (वय-32) व त्यांचा 4 वर्षीय मुलगा कबीरचा जागेवरच मृत्यू झाला. अनिल यांची पत्नी प्रज्ञा अनिल चेंडकापुरे (वय-28) यांचा पुलगाव येथील रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर आई लिलाबाई सारंगधर चेंडकापुरे (वय-60) यांचा सावंगी मेघे रूग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. रस्त्यावरील खड्डा चुकवण्याचा नादात ही अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अनिल सारंगधर चेंडकापुरे हे मागील अनेक वर्षांपासून नागपूर येथे राहत होत. त्यांचा पेंटींगचा व्यवसाय होता. ते आपल्या कुटुंबासोबत रक्षाबंधनासाठी मुळगावी निघाले होते.

VIDEO: '...तर मी लोकांना सांगेन कायदा हातात घ्या आणि धुलाई करा'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2019 08:08 PM IST

ताज्या बातम्या