भाजपा नेते आणि माजी खासदार विजय मुडे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

भाजपा नेते आणि माजी खासदार विजय मुडे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

एक शिक्षक आणि साध्या मनाचा कार्यकर्ता म्हणून विजय अण्णाजी मुडे यांनी आपली ओळख निर्माण केली होती.

  • Share this:

नरेंद्र मते, प्रतिनिधी

वर्धा, 15 ऑगस्ट : भाजपा नेते आणि माजी खासदार विजय मुडे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झालं आहे. विजय मुडे यांच्या जाण्यामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या जलगावमध्ये 16 डिसेंबर 1943 रोजी विजय मुडे यांचा जन्म झाला होता. मुडे यांनी 1967 ते 1990 पर्यंत त्यांनी शिक्षक रुपात कार्यरत होते. तर 1990 मध्ये मुडे यांना भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेत पाठवण्यात आले.

मुडे यांनी याच वेळी 11 व्या लोकसभेत काँग्रेसचे नेते वसंतराव साठे यांना पराभूत केलं होतं. 15 मे 1996 ते 4 डिसेंबर 1997 पर्यंत मुडे यांनी खासदारकीचं कार्य सांभाळलं. जिल्ह्यातील भाजपचे जेष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती.

पत्नी माहेरी गेली म्हणून आला राग, माजी सैनिकाने केला धक्कादायक प्रकार

एक शिक्षक आणि साध्या मनाचा कार्यकर्ता म्हणून विजय अण्णाजी मुडे यांनी आपली ओळख निर्माण केली होती. विधान परिषदेत सन 1990 ते 1996 मध्ये सदस्य म्हणून त्यांनी केलेले काम सगळ्यांसाठी मोलाचं ठरलं आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये भाजपचा झेंडा रोवण्यामध्ये मुडे यांचा मोठा हात आहे.

राज्यात कोरोनाचा कहर सुरूच, आजही समोर आला रुग्णांचा मोठा आकडा

15 मे 1996 ते 4 डिसेंबर 1997 या काळात ते भाजपचे जिल्ह्यतील पहिले खासदार होते. वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात त्यांनी भाजप पोहोचवण्यात त्याचा मोठा वाटा होता. पूर्ती समूहाचे ते उपाध्यक्ष होते. त्यांच्या कामामुळे त्यांची एक खास छबी राजकारणात उमटली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 15, 2020, 9:51 PM IST
Tags: BJP

ताज्या बातम्या