गडचिरोलीच्या महापूरात अडकलेल्या 4 जणांसह 500 मेढ्यांची थरारक सुटका!

गडचिरोलीच्या महापूरात अडकलेल्या 4 जणांसह 500 मेढ्यांची थरारक सुटका!

तेलंगणा पोलिसांनी सीमेवरील आपल्या असरअली पोलिसांना वायरलेसवरुन मदतीची मागणी केली होती. त्यानंतर ही सुटका करण्यात आली.

  • Share this:

महेश तिवारी, गडचिरोली 8 सप्टेंबर : गडचिरोलीतल्या महापूरात  राञीपासुन अडकलेल्या चार नागरीकासह पाचशे मेंढयांची पोलिंसांनी सुरक्षीत सुटका केली. गडचिरोली जिल्ह्यात तेलंगणा सीमेवर गोदावरी नदीच्या पुरात राञीपासुन चार नागरीक आणि पाचशे मेंढया अडकल्या होत्या. तेलंगणा पोलिसांनी सीमेवरील आपल्या असरअली पोलिसांना वायरलेसवरुन मदतीची मागणी केली होती. त्यानंतर ही सुटका करण्यात आली.

असरअली पोलीस आणि बचाव पथकाने वन विभागाची बोट घेऊन सोमणपल्ली ते पंकेना दरम्यान गोदावरी नदीत प्रवाहाच्या उलट्या दिशेने  जाऊन सदर  4 नागरिकाना  सुखरुपपणे बाहेर काढले त्यांच्यासोबतच 500  मेंढयांनाही सुरक्षीत बाहेर काढले. ते चार जण मेंढपाळ असून मेढ्यांना चरण्यासाठी ते घेऊन गेले होते आणि पुराच्या पाण्यात अडकले.

भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; महापौर, आमदरांनी बदललं जागेचं आरक्षण?

गडचिरोलीत 300 गावांचा संपर्क तुटला

संततधार पावसामुळे घरावर भिंत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. तुमसर तालुक्याच्या सिंधपुरी येथे रविवारी सकाळी ही घटना घडली. मिलकराम इसाराम शेंडे (54) याचा भिंतीच्या खाली दबून मृत्यू झाला आहे. तर कुंदा नेवारे (24) आणि निर्मला श्यामराव वगरे (50) या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.

महालक्ष्मीचे रुप समजून सासूबाईंनी केली आपल्या दोन्ही सुनांची पूजा...

मिळालेली माहिती अशी की, रविवारी सकाळी 7 वाजता सगुणाबाई शेंडे यांच्या घराची भिंत शेजारच्या घरावर कोसळली. मातीच्या ढिगाऱ्याखाली तीन जण दबले. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तिघांनाही बाहेर काढले. मात्र, तोपर्यत मिलकराम यांचा मृत्यू झाला होता. जखमींना तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, चार वर्षांपूर्वी सिंधपुरी गावात तलावाची पार फुटल्याने गावातील अनेक घरे कोसळून पडली होती. मात्र, गावातील लोकांना अजुनही घरकुलचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे बहुतांश गावकऱ्यांना धोकादायक घरात वास्तव्य करावे लागत आहे.

कलम 371ला धक्का लावणार नाही- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

दरम्यान, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाली असून वीस मार्ग बंद आहेत. जवळपास तीनशे गावांचा संपर्क तुटला आहे. भामरागडची पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. हेलिकॉप्टरने जिल्हाधिकारी शेखरसिंग आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भामरागडच्या पुरपरिस्थितीची पाहणी केली. पर्लकोटा आणि पामुलगौतम नदीच्या पाण्याने चारी बाजुने भामरागडला वेढा दिल्यानं सहाशे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2019 07:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading