इथं चक्क पाण्यावर तरंगतो 'राम' लिहिलेला दगड, Video व्हायरल

इथं चक्क पाण्यावर तरंगतो 'राम' लिहिलेला दगड, Video व्हायरल

पाण्यावर तरंगणाऱ्या दगडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

अमोल गावंडे,(प्रतिनिधी)

बुलडाणा,5 डिसेंबर: शहराजवळील येळगाव इथं चक्क पाण्यावर तरंगणारा दगड सापडला आहे. ब्रह्मानंद श्रीराम गडाख यांच्या धरण परिसरातील बुडीत क्षेत्रालगतच्या शेताजवळ हा दगड आढळून आला आहे. पाण्यावर तरंगणाऱ्या दगडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील येळगाव धरण परिसरालगत गडाख कुटुंबीयांकडे जेमतेम दीड एकर शेती आहे. बुधवारी घरातील पुरुष व महिला शेतावर गेले होते. दैनंदिन काम उरकत असताना ब्रह्मानंद गडाख यांनी धुऱ्यावरील धरणाच्या पाण्यामुळे वाहून आलेला काडी-कचरा बाजूला सारण्याचे काम सुरू केले. त्यातील दगड उचलून फेकले. यातील एक दगड पाण्यावर तरंगताना दिसला. कुतूहलापोटी त्यांनी दगड पुन्हा पाण्यात टाकून बघितला. तेव्हाही दगड पाण्यावर तरंगला. ही माहिती त्यांनी शेतात काम करत असलेले वडील श्रीराम व सदस्यांना दिली. त्यांनी धरणाच्या पाण्यात दगड तरंगतो तर विहिरीत तरंगेल काय म्हणून प्रयोग केला. विहिरीतही हा दगड तरंगू लागला. या दगडाचे वजन 1 किलो 50 ग्रॅम एवढे आहे. या तरंगणाऱ्या दगडाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दरम्यान, लंकेत प्रवेश करण्यासाठी श्रीरामचंद्रांनी समुद्रावर दगडाचा सेतू बांधल्याचा रामायणात उल्लेख आहे. रामसेतू याच दगडाने बांधला असावा, अशी चर्चा सुरू आहे.

सिल्व्हर सिटीत अंत्यविधीसाठी मोफत लाकडे पुरवते 'ही' फॅमिली!

सिल्व्हर सिटी म्हणून ओळख असलेली उद्योग नगरी खामगाव हे शहर देशभरात नावारूपाला आहे. याच शहरात राजकारणासह समाजसेवेचे व्रत घेतलेल्या सानंदा कुटुंबीयांनी शहरातील ओंकारेश्वर मुक्तीधाम या मोठ्या स्मशानभूमीत सरणासाठी लागणारी लाकडे मोफत देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. उपक्रम सुरू होऊन नऊ वर्षे उलटली आहेत. एका हजारांच्यावर पार्थिवांवर अंत्यसंस्कारासाठी आतापर्यंत जवळपास 12 लाख रूपये किमतीचे 3 लक्ष क्विंटल लाकडे दिली आहेत.

सानंदा कुटुंबाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जाते. परंतु राजकारणासोबत समाजकारणातही हे कुटुंब कायम आघाडीवर असते. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने गोरगरिबांना हातभार ते नेहमीच लावतात. यामध्ये माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचे वडील आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष तथा सुप्रसिद्ध उद्योगपती राणा गोकुलसिंहजी सानंदा यांच्या वाढदिवसानिमिताने विविध उपक्रमासह स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या कुटुंबाच्या खांद्यावरचा थोडाफार भार हलका करण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्याच कुटुंबाची परिस्थिती भक्कम असेल असे नाही. परंतु अनेकांना प्रत्येक गोष्टीसाठी हात पसरावा लागतो. त्यामुळे सामान्य नागरिकांसह इतरांसाठी देखील आपण काही तरी देणे लागतो. या विचाराने सानंदा यांनी परिवारात विचारविनिमय करून स्मशानभूमीत मोफत लाकडे देण्याची संकल्पना मांडली आणि त्याला सर्वानीच भरभरून प्रतिसाद दिला. फेब्रुवारी 2011 साली सुरु झालेला उपक्रम आजपर्यंत अविरत सुरु आहे. आतापर्यंत ओंकारेश्वर मुक्तीधाम या स्मशानभूमीत 1150 पार्थिवाच्या अंतिमसंस्कारासाठी प्रति अंत्यसंस्कार 250 किलो लाकडे देण्यात आली. साधारणत: या लाकडाचा खर्च 1 हजार रुपये ते पंधराशे रुपये एवढा होतो. त्यानुसार आतापर्यंत जवळपास 3 लाख क्विंटल लाकडे मोफत उपलब्ध करून देण्यात किंमती 12 लक्षच्या जवळपास खर्च करण्यात आला आहे. जेमतेम उत्पन्न असलेला व्यक्तीच्या घरात जर एखाद्याचे निधन झाले तर तो लाकडासाठी पैसे कोठून आणेल या विचाराने त्यांना या उपक्रमाची कल्पना सुचली आहे. या उपक्रमाचा अनेकांना मोठा आधार मिळाला आहे.

विदर्भात उपराजधानी नागपूरसह अनेक नगरपालिका आणि महानगर पालिकेत आपल्या हद्दीतील नागरिकांच्या अंत्यसंस्काराची सोय मोफत होती. घाटावर होणाऱ्या अंत्यसंस्काराला लाकूड विकत घ्यावे लागत नव्हते. ते नगरपालिका किंवा महापालिकेतर्फे मोफत दिले जात होते. मात्र, कोठेही ही योजना यशस्वीपणे चालू शकली नाही. किमान गोरगरिबांसाठी तरी ही योजना जिल्ह्यातील नगरपालिकेद्वारे राबविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 5, 2019, 3:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading