ड्रग्ज् तस्करांकडून पैसे घेऊन पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्याच प्रताप, पाच पोलिसांना अटक

एवढच नाही तर लाच म्हणून घेतलेले पैसे आणि ड्रग्ज् त्यांनी पोलीस स्टेशनच्याच कपाटात ठेवलं होतं. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती.

News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2019 05:12 PM IST

ड्रग्ज् तस्करांकडून पैसे घेऊन पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्याच प्रताप, पाच पोलिसांना अटक

नागपूर 22 ऑक्टोंबर : वाढत्या गुन्हेगारीमुळे टीकेचं लक्ष्य ठरणाऱ्या नागपूर पोलिसांवर पुन्हा एकदा नामुष्की ओढवलीय. ड्रग्ज् प्रकरणात तस्करांकडून पैसे घेऊन ते चक्क पोलीस स्टेशनमध्ये ठेवल्याचा आरोप या पोलिसांवर होता. त्यामुळे नागपूर पोलिसांना आपल्याच कर्मचाऱ्यांना अटक करण्याची वेळ आलीय. नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये हे सर्व कर्मचारी ड्युटीवर होते. या 5 पोलिसांनी ड्रग पेडलर कडून ड्रग्स् ताब्यात घेतलं. मात्र त्याची जप्ती न दाखवताच त्या सर्व ड्रग पेडलरला सोडून दिलं. एवढच नाही तर लाच म्हणून घेतलेले पैसे आणि ड्रग्ज् त्यांनी पोलीस स्टेशनच्याच कपाटात ठेवलं होतं. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती.

प्रदीप शर्मांना टक्कर देणाऱ्या हितेंद्र ठाकुरांनी जाहीर केला मोठा निर्णय

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना जेव्हा या पराक्रमाची माहिती कळली तेव्हा शोध घेण्यात आला तेव्हा धक्कादायक माहिती बाहेर आली होती. नंदनवन पोलीस स्टेशन मध्ये शोध घेतल्यावर एका कपाटात ते ड्रग आणि लाचेचे पैसे आढळले होते.अटक झालेल्या नंदनवन पोलीस पोलीस स्टेशनचे  कर्मचाऱ्यांची नावं अशी आहेत. सचिन एनप्रेड्डीवार, राजेंद्र शिरभाते, दिलीप अवगण, रोशन निंबार्ते आणि अभय मारोडे. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुन्यावण्यात आल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी राजेंद्र निकम यांनी दिलीय.

उदयनराजेंच्या गडाला सुरुंग लागणार? 'या' कारणामुळे वाढली डोकेदुखी

गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी नागपूर पोलिसांनी एक खास APPही बनवलं होतं. यात गुन्हारांची सर्व माहिती आणि फोटो देण्यात आले आहेत. तसच त्यावरून नागरिकांना तक्रार करण्याचीही सोय करण्यात आली होती. गुन्हेगारांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी आणि नागरिकांनाही त्यांची पार्श्वभूमी कळावी यासाठी पोलिसांनी हे APP विकसित केलं होतं.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2019 05:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...