गृहकलह: बापानेच केली पोटच्या मुलाची हत्या, डोक्यात घातला हातोडा

गृहकलह: बापानेच केली पोटच्या मुलाची हत्या, डोक्यात घातला हातोडा

मुलगा झोपेत असताना बापाने त्याच्या डोक्यात हातोडा घालून त्याला संपवले.

  • Share this:

हैदर शेख,(प्रतिनिधी)

चंद्रपूर,7 डिसेंबर: बल्लारपूर शहरातील विद्यानगर भागात जन्महात्या बापानेच मुलाची निर्घृण हत्या केली आहे. मुलगा झोपेत असताना बापाने त्याच्या डोक्यात हातोडा घालून त्याला संपवले. शनिवारी सकाळी झालेल्या घटनेने परिसर हादरला आहे. घरगुती कलहातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी सोपान नगराळे याने हातोडीसह केले पोलिस ठाण्यात केले आत्मसमर्पण केले आहे. मृत मुलगा राहुल सोपान नगराळे याचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. राहुल हा व्यसनाधीन होता. तो वडिलांशी कायम वाद घालत होता. शुक्रवारीही बापलेकामध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. या वादातूनच सोपान नगराळे याने मुलाच्या डोक्यात हातोडा घालून हत्या केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.

स्वच्छतागृहातला तो व्हिडीओ व्हायरल, मुलीची आत्महत्या

दरम्यान, विदर्भातील वाशिम शहरात धक्कादायक तितकीच खळबळजनक घटना घडली आहे. एका मुलीचा व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्यात आला होता. त्यामुळे धक्का बसल्याने त्या मुलीने आत्महत्या केली. देशभर मुलींवरच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. अशा घटनांमध्ये तातडीने तपास करून त्याची चौकशी करावी अशी मागणी होत आहे. समाजात सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच अशा घटना समोर येत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे.

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या वॉशरूममध्ये एकाने विद्यार्थिनीची मोबाइल क्लिप काढून सोशल मीडियावर प्रसारित केल्याने बदनामीच्या भीतीने मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या तरुणीच्या कुटुंबीयाच्या तक्रारीनंतर मंगरुळपीर पोलीस ठाण्यात 2 युवकांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मंगरुळपीर येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील एका 18 वर्षीय विद्यार्थिनीला नोट्सच्या मागणी करता एका मुलाने वॉशरूममध्ये बोलावले असता दुसऱ्या युवकाने दोघांचा बोलतानाचा व्हिडिओ काढून इतर लोकांच्या मोबाइलवर पाठवला. समाजात बदनामी होईल या भीतीने मुलीने पिंप्री गावी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

घटनेची फिर्याद मृतक मुलीच्या वडिलांनी मंगरुळपीर पोलीस ठाण्यात नोंदवताच पोलिसांनी दोन्ही आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून दोघांनाही अटक केली असून सायबर सेल मार्फत चौकशी करून किती लोकांना व्हिडीओ शेअर केला या बाबत उघड झाल्यानंतर आणखी आरोपी वाढणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Published by: Sandip Parolekar
First published: December 7, 2019, 3:26 PM IST
Tags: chandrapur

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading