...आणि म्हणून वडिलांनी DJ लावून काढली 22 वर्षीय लेकाची अंत्ययात्रा

...आणि म्हणून वडिलांनी DJ लावून काढली 22 वर्षीय लेकाची अंत्ययात्रा

21 फेब्रुवारी रोजी प्रणव राऊत या बॉक्सरनं आत्महत्या केली होती. त्यानंतर वडिलांनी धक्का बसला होता. मात्र तरी त्यांनी आपल्या लेकाची अंत्ययात्रा डीजेच्या तालावर काढली.

  • Share this:

अकोला, 24 फेब्रुवारी : घरात आनंदाचं वातावरण आणि कोणताही सोहळा, मिरवणूक म्हटलं की डीजेचा थाट तुम्ही पाहिलाच असेल. पण शनिवारी मात्र डीजे नागपूरमध्ये डीजे लावून चक्क तरुणाची अंत्ययात्रा काढण्यात आली. डीजेच्या मोठा आवाज ऐकल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. सगळेजण जड अंतकरणाने एकमेकांना धीर देत होते. ही अंत्ययात्रा होती महाराष्ट्राचा सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊत याची. अवघ्या 22 व्या वयात प्रवणने गळफास घेऊन आत्महच्या केली.

नागपूरातील 22 वर्षीय बॉक्सर प्रणव राऊत यानं आत्महत्या केली. प्रणव जेथे दररोज सराव करायचा त्याच स्टेडियमजवळ त्यानं आपले जीवन संपवलं. 21 फेब्रुवारीला सकाळी सव्वा नऊच्या सुमारास प्रणवने शास्त्रीय स्टेडियम जवळील क्रिडा प्रबोधनी येथेच गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकारामुळं संपूर्ण अकोल्यासह क्रीडा जगतात शोककळा पसरली आहे.

वाचा-पोलिसाने तरुणी बनून युवकाशी केलं चॅटिंग, अश्लील मेसेजने विश्वास जिंकला, आणि...

प्रणवनं महाराष्ट्रासाठी अनेक सुवर्णपदक जिंकली होती. मात्र त्यानं अचानक उचलेल्या या पावलामुळं त्याच्या प्रशिक्षकांना मोठा धक्का बसला. प्रणवनं शास्त्रीय स्टेडियम जवळील क्रिडा प्रबोधनी येथे गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर काही वेळाने क्रीडा प्रमुख अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर क्रीडा प्रमुखांनी रामदास पेठ पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान त्याच्या मित्रांनी आणि प्रशिक्षकांनी प्रणव आदल्या दिवशी सराव करत असल्याचंही सांगितलं.

वाचा-सैराट पार्ट-2! लेकीसोबत प्रेमविवाह केला म्हणून जावयाला बनवला कुत्रा आणि...

खरंतर आंतरराष्ट्रीय निवड चाचणीसाठी झालेल्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे नैराश्येतून प्रणवने आत्महत्या केल्याने त्याच्या वडीलांना धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे. प्रणवने लिहिलेल्या आत्महत्येच्या चिठ्ठीमध्ये, “बाबा मला माफ करा, मी तुमचे स्वप्न पूर्ण केलं नाही,” असं लिहिलं होतं. आपली अंत्ययात्रा डीजेच्या तालावर निघावी अशी इच्छा प्रणवने वडिलांकडे बोलू दाखवली होती. त्यामुळेच त्याच्या वडिलांना आपल्या तरुण मुलाच्या अंत्ययात्रेला डीजे लावून लाडक्या मुलाला अखेरचा निरोप दिला.

First published: February 24, 2020, 2:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading