लाडक्या लेकीसाठी वडिलांचं ‘यकृत’ दान, नागपूरातल्या दमलेल्या बाबांची थक्क करणारी कहाणी

लाडक्या लेकीसाठी वडिलांचं ‘यकृत’ दान, नागपूरातल्या दमलेल्या बाबांची थक्क करणारी कहाणी

लेकीला या संकटातून बाहेर काढायचं, पैशांची जुळवाजुळव करायची आणि यकृत प्रत्यारोपणासाठी तयारी करायची अशी अनेक काम त्यांना काही दिवसांमध्ये करायची होती.

  • Share this:

नागपूर 03 नोव्हेंबर: मुलं म्हणजे आई-वडिलांसाठी जीव की प्राण असतात. त्यांच्यासाठी वाट्टेल ते करण्याची पालकांची तयारी असते. मुलांनी मोठं व्हावं सुखी राहावं यासाठी आपले प्राण पणाला लावण्यासाठीही ते मागे-पुढे पाहात नाहीत. नागपूरमधल्या (Nagpur) अशाच एका वडिलांनी आपल्या लेकीसाठी यकृत दान (liver transplant) केलं आणि तिला जीवदान मिळवून दिलं. पण ही प्रक्रिया त्यांची प्रचंड दमछाक करणारी आणि दमवणारी ठरली. मात्र हा बाप डगमगला नाही. त्याची ही धडपड पाहून अनेक हात मदतीसाठी पुढे आलेत.

नागपूरातले पत्रकार योगेंद्र शंभरकर यांची लाडकी 8 वर्षांची कन्या ग्रीष्मा हिची प्रकृती तीन आढवड्यांपूर्वी ढासळली होती. ग्रीष्माला त्यांनी धंतोलीतल्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यावर आणि विविध चाचण्या झाल्यावर ग्रीष्माचं यकृत निकामी झाल्याचं आढळून आलं. तिला यकृताचा अतिशय दुर्मिळ आजार झाल्याचं डॉक्टरांनी निदान केल्याने योगेंद्र यांना मोठा धक्का बसला.

या आजारावर यकृत प्रत्यारोपण (Liver transplant) हाच एकमेव उपाय असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यासाठी 30 लाखांचा खर्च अपेक्षीत होता. बेताचीच आर्थिक परिस्थिती असलेल्या योगेंद्र यांच्यापुढे अनेक प्रश्न निर्माण झाले. लेकीला या संकटातून बाहेर काढायचं, पैशांची जुळवाजुळव करायची आणि यकृत प्रत्यारोपणासाठी तयारी करायची अशी अनेक काम त्यांना काही दिवसांमध्ये करायची होती.

मुंबईत दिवाळीनंतर येवू शकते COVID-19ची दुसरी लाट, तज्ज्ञांनी दिला इशारा

त्यात कोरोनाचं संकट असल्याने सगळीच कामे अतिशय काळजीपूर्वक करावी लागणार होती. यकृत प्रत्यारोपणाच्या ऑपरेशनसाठी तिला न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. योगेंद्र यांनीच लेकीसाठी यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अर्ज करून परवानगी घेतली गेली. हे सगळं करत असतानाच पैशाची जमवाजमव कशी करण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं. नागपूरातले त्यांचे मित्र, नातेवाईक, दानशूर, काही सामाजिक संघटना अशी सगळी मंडळी त्यांच्या मदतीला धावून आली.

...मग मेधा कुलकर्णींचं तिकीट का कापलं? भुजबळांचा पाटलांना सणसणीत टोला

योगेंद्र यांची धडपड पाहून हॉस्पिटलनेही फी मधले काही पैसे कमी केले. आणि दसऱ्याला ग्रीष्मावर यशस्वी शस्रक्रिया करण्यात आली. वडिलांची धडपड अखेर फळाला आली. आता बाप लेकीची प्रकृती चांगली आहे. योगेद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्जही मिळालाय.

गेल्या 8 महिन्यात मध्य भारतात झालेले हे पहिलेच लाईव्ह ऑर्गन ट्रान्सप्लांट असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 3, 2020, 5:24 PM IST
Tags: nagpur

ताज्या बातम्या