Home /News /maharashtra /

वर्ध्यात 'युवा परिवर्तन'चा राडा, कृषी अधिकारी कार्यालयाची तोडफोड करून कर्मचाऱ्यांना कोंडले; पाहा VIDEO

वर्ध्यात 'युवा परिवर्तन'चा राडा, कृषी अधिकारी कार्यालयाची तोडफोड करून कर्मचाऱ्यांना कोंडले; पाहा VIDEO

उद्धट वागणूक दिल्याने संतप्त होत कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचं आंदोलकांनी सांगितलं आणि उद्धट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

    नरेंद्र मते, वर्धा 07 ऑक्टोबर: वर्ध्यात शेतकऱ्याच्या प्रश्नावर आंदोलकांनी उग्र रुप धारण केलं. (Farmers Agitation in wardha ) जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात ‘युवा परिवर्तन की आवाज’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणी दोनदा निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने आंदोलन केल्याचा दावा संघटनेने केला आहे. जिल्ह्यात शेकडो शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला मात्र सरकारी अधिकारी कामच करत नाहीत. खासगी कंपन्यांना पाठिशी घालतात असाही आरोप केला जात आहे. संघटनेने कार्यकर्ते दुपारी कृषी कार्यालयात आले आणि त्यांनी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर आलं नसल्याने त्यांनी घोषणाबाजी करत कार्यालयातल्या खुर्च्यांची मोडतोड केली. आणि जातांना त्यांनी कार्यालयाला ताळे ठोकत अधिकाऱ्यांना कोंडून घेतलं. वर्धा : जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात युवा परिवर्तन की आवाज संघटनेकडून तोडफोड, कार्यालयात कर्मचाऱ्यांना कोंडून लावलं कुलूप pic.twitter.com/tNC86LIkJB — News18Lokmat (@News18lokmat) October 7, 2020 कार्यालयात चर्चेसाठी गेले असता कार्यालय प्रमुख अजय राऊत यांनी आंदोलकांना उद्धट वागणूक दिली. उद्धट वागणूक दिल्याने संतप्त होत कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचं आंदोलकांनी सांगितलं आणि उद्धट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. रामनगर पोलिसांना घटनेची महिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी माध्यस्ती करत कुलूप उघडले. तर यवतमाळ जिल्ह्यातही शेतकऱ्यांनी मंगळवारी भाकरी -चटणी आंदोलन केलं होतं. 'हो, आहोत आम्ही 'अमर अकबर अँथनी'' दानवेंच्या वक्तव्यावर अनिल देशमुखांचा पलटवार यवतमाळ जिल्हयात घाटंजी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चटणी भाकर एल्गार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन कर्त्यांनी तहसील ऑफिसच्या समोरच चूल पेटवत चटणी भाकर तयार केली. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून होत असलेल्या नापिकीमुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याला कर्जाच्या डोंगरातून बाहेर काढायचं असेल तर 2009 ते 2016 पर्यंत संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. बिहार: शिवसेनेची काँग्रेसला साथ? गुप्तेश्वर पांडेंच्या विरोधातही उमेदवार देणार CCIची कापूस खरेदी लवकर सुरू करावी, सोयाबीनची शासकीय खरेदी त्वरीत चालू करा, घाटंजी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला द्या या मागण्या घेऊन बहुजन वंचित आघाडीच्या वतीने घाटंजी तहसीलदार कार्यालय समोर चटणी भाकर आंदोलन करण्यात आले. आंदोलन स्थळी महिलांनी चटणी भाकर तयार करून शासनाच्या धोरणाचा निषेध केला.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Farmer, Wardha news

    पुढील बातम्या