Elec-widget

नागपुरात इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला अश्लील क्लीप व्हायरल करण्याची धमकी

नागपुरात इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला अश्लील क्लीप व्हायरल करण्याची धमकी

अश्लील व्हिडिओ क्लीप व्हायरल करण्याची धमकी देऊन इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला पाच लाख रुपयांची मागणी करणाऱ्या आरोपींना सायबर सेलच्या मदतीने अटक करण्यात आली.

  • Share this:

हर्षल महाजन,(प्रतिनिधी)

नागपूर, 14 ऑगस्ट- अश्लील व्हिडिओ क्लीप व्हायरल करण्याची धमकी देऊन इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला पाच लाख रुपयांची मागणी करणाऱ्या आरोपींना सायबर सेलच्या मदतीने अटक करण्यात आली.  विशेष म्हणजे कुवैतवरून विद्यार्थिनीला धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. डॉ.अभय कुमार ब्रिजकिशोर प्रसाद (वय-39, रा.पाटणा), मार्टिन डिक्रूज ऊर्फ फिरोज अब्दुल रहीम अन्सारी (वय-29,रा.झारखंड) नौफल पी. कुंजीयन (वय-35,रा.केरळ) अशी आरोपींची नावे आहेत.

पीडित युवती प्रतापनगर येथील रहिवासी आहे. तिची सात-आठ वर्षांपूर्वी डॉ. प्रसाद याच्याशी सोशल मीडियावरून ओळख झाली होती. युवतीची आर्थिकस्थिती उत्तम आहे. डॉ. प्रसाद हा आर्थिक तंगीत होता. त्यातच कौटुंबिक वाद न्यायालयात सुरू असल्याने त्याने युवतीला ब्लॅकमेल करण्याचे ठरविले. डॉ. प्रसाद याचा फिरोज अन्सारी हा मित्र आहे. प्रसादने फिरोजला तिच्याशी मैत्री करण्यास सांगितले. फिरोजने तिला आपल्या जाळ्यात ओढले. युवतीची विदेशात उच्चशिक्षण घेण्याची इच्छा होती. फिरोजने तिला विदेशात प्रवेश मिळवून देण्याचे सांगितले. फिरोज मे 2017 मध्ये कुवैत येथे जनरेटर मेकॅनिक म्हणून काम करीत होता.

त्यामुळे युवती त्याच्या जाळ्यात ओढल्या गेली.फिरोजने युवतीची अश्लील व्हिडिओ क्लीप मिळविली. त्या आधारे तो युवतीला फोन करून पाच लाख रुपयांची मागणी करू लागला. पैसे न दिल्यास व्हिडिओ क्लीप व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला.युवतीने घरच्यांना हा प्रकार सांगितला. तपासात युवतीला गोवा येथील मडगाव व केरळातील मल्लापुरम येथून फोन आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मल्लापुरम येथून नौफल याला अटक केली. दरम्यान, युवतीने पैसे न दिल्यामुळे फिरोजने तिच्या सहा क्लीपिंग व्हायरल केल्या. पोलीस सतर्क असल्याने त्यांनी ट्विटर तसेच पोर्न साईटवरून या क्लीपिंग काढून घेतल्या. युवतीने फिरोजला केवळ पाच क्लीप पाठविल्या होत्या. एक क्लीप डॉ. प्रसादला पाठविली होती. त्यामुळे पोलिसांना डॉ. प्रसादवर संशय आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता, त्याने व्हिडिओ क्लीप फिरोजला दिल्याचे सांगितले.

फिरोज कुवैतला होता. त्यामुळे भारतात येईपर्यंत त्याला पकडणे शक्य नव्हते. फिरोजविरुद्ध लुटपाट व कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी फिरोजविरुद्ध एलओसी जारी केला. पोलिसांना फिरोज 8 ऑगस्टला भारतात येत असल्याची माहिती मिळाली. 8 ऑगस्टला फिरोज दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला असता अधिकाऱ्यांनी त्याला आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती अंबाझरीचे पोलिस निरीक्षक विजय करे यांनी दिली आहे.

Loading...

सीम बॉक्सवर 30 ते 35 सीमकार्ड

कॉल कुवैतहून वरून यायचे पण लोकेशन भारतातील दाखवायची आरोपींनी पैसे मागण्यासाठी हायटेक टेक्नॉलॉजी वापरली. फिरोज आपल्या फोनमधून व्हाईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल चा वापर करून गोवा व मल्लापुरमच्या सीम बॉक्सवर फोन करीत होता. सीम बॉक्सवर 30 ते 35 सीमकार्ड असतात. येथून कॉल भारतीय नंबरवर डायव्हर्ट होऊन पीडित युवतीच्या मोबाईलवर कनेक्ट होत होते. पोलिसांना सीडीआर रिपोर्टमध्ये मडगाव, गोवा, मल्लापुरम, केरळ येथून कॉल आल्याची माहिती मिळाली. तिथे पोहचल्यानंतर पोलिसांना खरी परिस्थिती के आहेत ते कळले. अनेक ठिकाणी असे बोगस कॉल सेंटर आहेत. याचा वापर आतंकी संघटनाही करीत असल्याचे बोलले जात आहे.

दूरसंचार विभागाला लावला 6 कोटीचा चुना

मडगाव व मल्लापुरममध्ये मिळालेल्या बोगस कॉल सेंटरवर रोज शेकडोच्या संख्येने विदेशी कॉल येतात. या आयएसडी कॉलमुळे दूरसंचार विभागाच्या 6 कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी बोगस कॉल सेंटरमधून 755 सीमकार्ड व 10 सीम बॉक्स ताब्यात घेतले. दक्षिण भारतात 60 ते 65 हजार रुपयात सीम बॉक्स मिळतो. तिथे अनेक लोक याचा किरायाने देऊन व्यवसाय करतात. फिरोज फक्त डिप्लोमा पास झाला आहे. परंतु त्याने ह्या प्रकरणाला अतिशय शिताफीने हाताळले होते. त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना 13 राज्यात तपास करावा लागल्याची माहिती पोलिस उपायुक्त विनिता साहू,यांनी दिली आहे.

पाकिस्तानच्या सांगण्यावरून शोभा डे यांनी भारत सरकारविरोधात लेख लिहिला?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 14, 2019 10:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com