ऊर्जामंत्र्यांच्या नागपूरातच कार्यकर्त्यांचा राडा, वीज बिल माफीसाठी ऑफिसचं तोडलं कुलूप VIDEO

ऊर्जामंत्र्यांच्या नागपूरातच कार्यकर्त्यांचा राडा, वीज बिल माफीसाठी ऑफिसचं तोडलं कुलूप VIDEO

पोलीस आणि महिला कार्यकर्त्या यांची झटापट झाली आणि महिलांनी गेट चढून आत शिरून गेटचं लॉक तोडलं आणि वीज बिल माफ करा अशी मागणी केली.

  • Share this:

नागपूर 03 नोव्हेंबर: लॉकडाऊनच्या काळात लोकांना भरमसाठ वीज बिल (Increased-electricity bills) आल्याने अनेकांना धक्का बसल होता. तर बीलावरची रक्कम पाहून अनेकांचे डोळेच पांढरे झाले. हे वीज बिल कमी व्हावं म्हणून राज्यभर आंदोलने करण्यात येत आहेत. राज्य सरकारने त्याबाबत काही संकेतही दिले होते. मात्र लोकांमधला संताप कमी होण्याची चिन्हे नाहीत ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy minister Nitin raut) यांच्या नागपूरातच विदर्भवादी कार्यकर्त्यांनी राडा केला. ऊर्जा विभागाच्या कार्यालयातबाहेरच राडा केला. त्यामुळे काही काळ तणावाचंही वातावरण निर्माण झालं होतं.

महावितरण ने पाठवलेले अवाजवी बिल कमी करण्यात यावे यासाठी अनेक दिवसांपासून नागपूर मध्ये आंदोलन केल्या जात आहे. अनेकदा आश्वासन देऊन देखील वीज बिल माफ करण्यात आले नाही. अनेकांना 50 हजाराचे बिल देण्यात आले आहे ते कमी करण्यात यावे या मागणीसाठी मंगळवारी गांधीबाग विभागातील पॉवर ऑफिस मध्ये विदर्भवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धडक मोर्चा काढला. या कार्यालयाला ऑफिसच्या लोकांनी गेट बंद करून कुलूप लावलं होत.

पोलीस आणि महिला कार्यकर्त्या यांची झटापट झाली आणि महिलांनी गेट चढून आत शिरून गेटचं लॉक तोडलं आणि वीज बिल माफ करा अशी मागणी केली. आता आश्वासने खूप झाली कार्यवाही कर, तातडीने निर्णय घेऊन वीज बिल माफ करा अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.

दरम्यान या प्रश्नावर लवकरच दिलासा मिळेल असे संकेत ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin raut) यांनी सोमवारी मुंबईत दिले होते. दिवाळी आधी निर्णय होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, वाढीव वीज बिल संदर्भात मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता, वित्त विभागात फाईल गेली आहे, अर्थमंत्री अजित पवार कोरोना झाला त्यामुळे ते आले की निर्णय होईल. पण दिवाळी आधी लोकांना दिलासा मिळेल असे संकेतही राऊत यांनी दिले.

लॉकडाउनच्या काळात लोकांना वीजेची अव्वाच्या सव्वा बीलं आली होती. त्यावरून असंख्य तक्रारी केल्या गेल्या. राजकीय पक्षांनीही आवाज उठवला होता.

ऊर्जामंत्री म्हणाले, 12 ऑक्टोबरला मुंबई अंधारात गेली, त्याची नेमकी कारणे काय याविषयी माहिती घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे. या आधी कळवा, आणि आता टाटा पॉवर प्लान्ट आणि मंगळवारी अदानी वीज कंपनी येथे जाणार आहे. भविष्यात मुंबईत वीज जाता कामा नये यासाठी आढावा घेतला जात आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 3, 2020, 3:54 PM IST
Tags: nagpur

ताज्या बातम्या