धक्कादायक.. शरद पवारांच्या सभेसाठी चक्क चोरली वीज, या प्रचारसभेत घडला प्रकार

शरद पवार यांनी जनतेला संबोधित केले. मात्र, या सभेसाठी लागणारा विद्युत पुरवठा वीज खांबावरून चोरण्यात आला.

News18 Lokmat | Updated On: Oct 10, 2019 08:08 PM IST

धक्कादायक.. शरद पवारांच्या सभेसाठी चक्क चोरली वीज, या प्रचारसभेत घडला प्रकार

वर्धा,10 ऑक्टोबर:विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा झंझावात दौरा सुरु आहे. हिंगणघाट येथे गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी शरद पवारांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या सभेसाठी चक्क वीज चोरी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हिंगणघाट येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजू तिमांडे यांच्या प्रचारासाठी हिंगणघाटच्या गोकुलधाम मैदानात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला शरद पवार यांनी जनतेला संबोधित केले. मात्र, या सभेसाठी लागणारा विद्युत पुरवठा वीज खांबावरून चोरण्यात आला. सभेसाठी एक छोटे जनरेटर सुद्धा आणण्यात आले होते. मात्र, आकडा टाकत वीज चोरण्यात आल्याचे समोर आले होते. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसने अद्याप याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

मुख्यमंत्र्यांनी नागपूरला बनवलं 'क्राईम सिटी', शरद पवारांचा पलटवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरात सभा घेऊन देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. नागपूरात वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी नागपूरला क्राईम सिटी अशी नवी ओळख दिली. छत्रपतींचे स्मारक, इंदू मिलवरचे बाबासाहेबांचे स्मारक 0अशा सगळ्या प्रकल्पांची कामं रखडली आहेत. एक विटही रचली गेली नाही. काम तर काही केलं नाही मात्र मलाच खोट्या गुन्ह्यात अडकवलं. आता तुमचे काय हाल करेल याचा विचार करा आणि आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन त्यांनी केलं. ते पुढे म्हणाले, राज्यात कुठल्याही रस्त्याने गेलात तर खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळते. आम्ही आघाडीच्या काळात खड्डे 'मुक्त' राज्य घडवण्याचा संकल्प केला होता, मात्र या सरकारने खड्डे'युक्त' राज्य घडवण्याचा निर्धार केलाय. अपघातात अनेकांनी आपले प्राण गमावले. पण सरकारला लोकांच्या जीवाची पर्वा नाही.

शेतकऱ्याला दोन पैसे मिळायला या सरकारची ना आहे. आपल्या राज्यात कांद्याला चांगला भाव मिळत असताना या सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली आणि परदेशी कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच शेतकरी उध्वस्त झालाय. या भागात अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांनी पीकविमा काढून देखील त्यांना पैसे मिळाले नाहीत. सरसकट कर्जमाफीची घोषणा यांनी केली पण अजूनदेखील 70 टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही.

Loading...

VIDEO:उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, औरंगाबादेत सुखरूप लँडिंग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2019 08:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...