महाराष्ट्रातल्या 8 गावांना मिळाली 72 वर्षानंतर वीज

महाराष्ट्रातल्या 8 गावांना मिळाली 72 वर्षानंतर वीज

एका सामाजिक कार्यकर्त्याने जेव्हा वीज मंडळाला जागा दान दिली त्यानंतर मंडळाने केंद्र उभारलं आणि 8 गावात प्रकाश आला.

  • Share this:

किशोर गोमासे, 10 सप्टेंबर : 10 सप्टेंबर : देशाने अनेक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली असली तरी देशातल्या अनेक भागत अजुनही वीज पोहोचलेली नाही. गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारने देशातल्या 14 हजार गावांमध्ये वीज जोडणी दिली. त्यानंतरही अनेक भागात वीज पोहोचलेलीच नाही. वाशीम जिल्ह्यातल्या दुर्गम आठ गावांमध्ये तब्बल 72 वर्षींनी वीज पोहोचली आहे. जिल्ह्यातील कुऱ्हा  परिसरातील 8 गावांना स्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतरही कायमस्वरूपी वीज मिळत नसे मात्र कुऱ्हा गांवात नवे 33 केव्ही वीज उपकेंद्र कार्यांवित झाल्याने या भागातील अंधार कायमचा दूर झालाय. कुऱ्हा हा डोंगराळ व आदिवासी बहुल भाग आहे. या परिसरातील 8 गावांमध्ये वीजेची कायम समस्या होती. ही समस्या निकाली काढण्यासाठी वीज उपकेंद्रांची निर्मिती करणं गरजेचं असल्याने देविदास नागरे या सामाजिक कार्यकर्त्यांनी आपली जमीन वीज उपकेंद्रासाठी दान केली. त्यामुळे  सुसज्ज असं 33 केव्ही वीज उपकेंद्र अवघ्या 8 महिन्यात कार्यान्वित झालं.

काँग्रेसला एकाच दिवसात दुसरा धक्का, उर्मिलानंतर आणखी एका नेत्याचा राजीनामा

त्या केंद्राचं उद्घाटन आमदार अमित झनक, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखन ठाकूर, समाजिक कार्यकर्ते देविदास नागरे व सचिन इप्पर यांच्या उपस्थितीत पार पडलं. या विजकेंद्रामुळे कुऱ्हा भागात 24 तास वीज उपलब्ध झाल्याने या भागातल्या नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय. तर यामुळे या भागाच्या विकासालाही हातभार लागेल असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केलाय.

MIMने जाहीर केली विधानसभा निवडणुकीची पहिली यादी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष जोरदार करत आहेत. युती, आघाडी कशी आणि कोणा सोबत करावी. जागा वाटपाचे सूत्र काय अशी चर्चा सुरु असताना MIM (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen) पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर करुन सर्वांना धक्का दिला आहे. विशेष म्हणजे आजच पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा केली होती.त्यानंतर त्यांनी सर्व पक्षांना धक्का देत विधानसभेच्या तीन जागांसाठीचे उमेदवार जाहीर केले.

झालं ठरलं! काँग्रेसला बसणार हादरा, हा दिग्गज नेता उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार

MIMने विधानसभा निवडणुकीसाठी वडगाव शेरी, नांदेड उत्तर आणि मालेगाव या तीन मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाने वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून डॅनियल लांडगे यांना, नांदेड उत्तर मधून मोहम्मद फेरोज खान लाला यांना तर मालेगाव मध्य मुफ्ती मोहंमद इस्माईल यांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात MIMने बाजी मारली आहे.

महाराष्ट्राचा महासंग्राम : कोथरुडमध्ये उमेदवारीची बाजी कोण मारणार?

त्याआधी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी घेतलेल्या निर्णयावर असदुद्दीन ओवैसी यांनी शिक्कामोर्तब केले. जलील यांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या वैयक्तिक निर्णय नसून तो पक्षाचा निर्णय आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी MIM आणि भारिपचा काडीमोड झाला. विधानसभा निवडणुकीआधी वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठी फूट पडली आहे. जागावाटपावरून प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर नाराज होऊन या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय एमआयएमने घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 08:34 PM IST

ताज्या बातम्या