पावसाचा अंत्ययात्रेलाही फटका, पूल तुटल्याने मानवी साखळी करून न्यावं लागलं पार्थिव

अंत्यविधीसाठी येणाऱ्या पाहुण्यांनाही जीवघेणी कसरत करावी आणि लाकडेही लवकर मिळाली नाही.

News18 Lokmat | Updated On: Nov 4, 2019 05:58 PM IST

पावसाचा अंत्ययात्रेलाही फटका, पूल तुटल्याने मानवी साखळी करून न्यावं लागलं पार्थिव

अमोल गावंडे, खामगाव 4 नोव्हेंबर : अवकाळी पावसाने कहर केल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना जसा बसला तसाच इतर नागरिकांनाही बसलाय. खामगाव तालुक्यात एका पावसाने नदीवरचा पूलच तुटल्याने अंत्ययात्रा काढतानाही लोकांचे प्रचंड हाल झाले. अंत्ययात्रेत तिरडी खांद्यावरून न नेता लोकांना मानवी साखळी करून न्यावी लागली. खामगाव तालुक्यातील पोरज येथील ही घटना आहे. पोरज येथील तरुण प्रवीणसिंग अरविंदसिंग बोराडे यांचा पाय घसरून निन्म ज्ञानगंगा प्रकल्प च्या सांडव्या मध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली मृतदेहाचा शोध पिंपळगाव राजा येथील पथकाकडून  घेणे सुरू होते मात्र रात्री अंधार पडल्याने शोधकार्य थांबवण्यात आलं होतं सकाळी मृतदेह पाण्यामध्ये आढळून आल्याने पोरज काळेगाव निमकवळा वर्णा येथील नागरिकांना दोराच्या साह्यने गळ टाकून मृतदेह बाहेर काढण्यात यश आला.

मुख्यमंत्रिपदावर देवेंद्र फडणवीस शिवसेनेला नकोत का? काय म्हणाले संजय राऊत

पावसामुळे गावतल्या ज्ञानगंगा नदीला पूर आलेला आहे. मुख्य रस्त्याच्या पूलावरून तीन ते चार फूट पाणी वाहत होतं. बाजार रस्ता हाही चिखलमय झाला होता. त्यामुळे अंत्ययात्रा काढायची कशी असा पेच गावकऱ्यांपुढे निर्माण झाला. गावात अंत्यविधीसाठी येणाऱ्या पाहुण्यांनाही जीवघेणी कसरत करावी लागली.एवढच नाहीतर अंत्यविधी साठी लागणारे लाकूड लाकडे सुद्धा शेजारच्या गट ग्रामपंचायत असलेली तांदूळवाडी येथून ट्रॅक्टर द्वारे स्मशानभूमीत पोहोचविण्यात आलं. मृतदेह अंत्यविधीसाठी बाहेर  घेऊन जाण्याचा रस्त्यावरही पाणी असल्याने मानवी साखळी तयार करून पार्थिव अंत्यविधीसाठी स्मशानभूमीमध्ये नेण्यात आलं. सर्व गावकऱ्यांच्या वतीने अत्यंविधिसाठी आलेल्या मंडळींना सुद्धा गावामध्ये हात पकडून दोघा दोघांनी मिळून नदीपलीकडे आणलं गेलं.

'तरुण भारत'च्या लेखावर संजय राऊतांचं फडणवीस स्टाईल उत्तर, पाहा हा VIDEO

निमकवळा येथे झालेला प्रकल्प हा पोरज गावा करिता डोकेदुखीच झाला आहे. आतापर्यंत या पुलाची उंची वाढायला हवी होती मात्र तसं झाले नाही. दुसरीकडे पोरज भालेगाव बाजार रस्ता सुद्धा मोठ्या प्रमाणात चिखलमय झाल्यामुळे त्या मार्गानेही दळणवळण होत नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक वर्षापासून जीवघेणा त्रास सहन करावा लागतोय. या पूलाची उंचा वाढवावी अशी मागमी ग्रामस्थ गेली अनेक वर्ष करताहेत मात्र त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष्य होत असल्याने ग्रामस्थांचे आणखी किती हाल करणार असा सवाल गावकऱ्यांनी केलाय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2019 05:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...