तू तू मैं मैं: ठाकरे सरकारमधल्या आणखी दोन मंत्र्यांची जुंपली

तू तू मैं मैं: ठाकरे सरकारमधल्या आणखी दोन मंत्र्यांची जुंपली

आपसातले मतभेद जाहीर न करता ते समन्वय समितीच्या बैठकीत मांडले पाहिजे असं मत शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेकदा व्यक्त केलं होतं. मात्र त्याचा परिणाम झालेला नाही.

  • Share this:

अमरावती 8 फेब्रुवारी : महाविकास आघाडीच्या सरकारने केलेली दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं असल्याची टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली होती. तर बच्चू कडू यांना दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं असल्याचं वाटत असेल त्यांनी सरकारमधून बाहेर पडावं असा टोला राज्यमंत्री व शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी लगावला आहे. त्यावर सरकार पर्यंत माहिती पोहचविणे हा काही गुन्हा नाही, आणि ते सरकारच्या विरोधतही नाही. मंत्री म्हणून ते आमचं काम आहे. आमदार म्हणून जे ग्राउंडवर आहे ते सरकार पर्यंत पोहचवीने हे काम आहे.

ज्या चुका प्रशासनाकडून होत आहेत. त्या चुका सरकारने दुरुस्त केल्या पाहिजे. त्यामुळे अब्दुल सत्तारांना तो अधिकार नाही. त्यांनी त्यांचं बघावं असा टोला राज्यमंत्री बच्चू कडू यानी सत्तारांना लगावला.

तर भाजपचे माजी मंत्री महाविकास आघाडीच्या संपर्कात आहे येत्या आठवडाभरात मोठे फेरबदल होतील असे नवाब मलिक म्हणाले होते.

किमान 7 तास तरी झोपू द्या, सकाळी उठण्यावरून पवारांच्या आव्हाडांना कानपिचक्या

त्यांच्या वक्तव्यावर बच्चू कडू म्हणाले की, जिधर बम उधर हम, ज्यावेळी भाजपची सत्ता होती तेव्हा भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू होतं, आता महाविकास आघाडीची सत्ता असल्याने इकडे सुद्धा इन्कमिंग सुरू होईल, ही एक आपल्या देशाला लागलेली कीड आहे असं सुद्धा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले.

'मनसे'च्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली, फक्त सभा घेण्याची अट

या आधीही ठाकरे सरकारमधल्या मंत्र्यांचे वाद, कुरबुरी आणि मानापमान यांच्या बातम्या  आलेल्या होत्या. आपसातले मतभेद जाहीर न करता ते समन्वय समितीच्या बैठकीत मांडले पाहिजे असं मत शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेकदा व्यक्त केलं होतं. मात्र त्यानंतरही मतभेदांच्या घटना घटना पुढे येत आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2020 03:49 PM IST

ताज्या बातम्या