कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी नागपूरमध्ये राबवणार धारावी पॅटर्न, तज्ज्ञांची टीम दाखल होणार

कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी नागपूरमध्ये राबवणार धारावी पॅटर्न, तज्ज्ञांची टीम दाखल होणार

नागपूरच्या परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

  • Share this:

नागपूर, 3 सप्टेंबर : नागपूर शहरात व ग्रामीण भागात कोरोनाची रुग्ण संख्या ही वाढत आहे. त्यामुळे धारावी व कोळीवाड्यासह मुंबईतील इतर भागातील कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी ज्या तज्ञांनी उपायोजना केल्या, त्यांना चार सप्टेंबरला नागपूर येथे घेऊन येऊन विभागीय आयुक्त कार्यालय येथे दुपारी साडेबारा वाजता नागपूरच्या परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

या तज्ज्ञांच्या टीममध्ये मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांचासह डॉ हेमल शहा Nephrologist, डॉ राहुल पंडीत INTENSIVIS (गंभीर रोग विशेषज्ञ), डॉ मुफझल लकडावाला GENERAL SURGEON (जनरल सर्जन) , डॉ गौरव चतुर्वेदी (कान नाक घसा विशेषज्ञ ) यांच्यासह इतर तज्ज्ञांचा समावेश आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

मुंबई येथील हॉटस्पॉट ठरलेल्या कोळीवाडा व धारावीसह मुंबईच्या इतर भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत होते. परंतु आता येथील परिस्थिती सामान्य झाली आहे. त्याच पद्धतीने किंबहुना त्यापेक्षाही जास्त आता नागपूर शहरात व ग्रामीण भागात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

ज्या पद्धतीने धारावी व कोळीवाडासह मुंबईतील इतर भागात कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनी प्रयत्न केले त्याच धर्तीवर त्यांचा अनुभव घेऊन नागपुरात काय उपाय योजना कराव्या लागतील याची चर्चा या बैठकीत होणार आहे. डॉ हेमल शहा, डॉ राहुल पंडीत, डॉ मुफझल लकडावाला, डॉ गौरव चतुर्वेदी यांनी ज्या पद्धतीने मुंबई येथे कोरोनाची परिस्थिती हाताळली त्याच पद्धतीने नागपूर येथील परिस्थिती कशी हाताळायची यावर ते मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सुद्धा अनिल देशमुख यांनी दिली.

Published by: Akshay Shitole
First published: September 3, 2020, 7:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading