गणपती विसर्जन करायला आला आणि भाविक पाण्यात वाहून गेला!

उपस्थित नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने त्याला यश आलं नाही. लोकांनी त्यांचा शोध घेतला मात्र अजुनही थांगपत्ता लागला नाही.

News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2019 05:25 PM IST

गणपती विसर्जन करायला आला आणि भाविक पाण्यात वाहून गेला!

भंडारा 12 सप्टेंबर : लाखांदूर तालुक्यातील ढोलसर गावात राहणारा लोकेश देवराम शिवणकर हे भाविक गणपती विसर्जना दरम्यान मासळ शेतशिवारातील नाल्यात वाहून गेला. त्यांचे वय 40 वर्षे होतं. आज ढोलसर वरुन वाजत गाजत गणपती विसर्जना ची मिरवणुक मासळ जवळील नाल्यावर आली असताना मासळ- बाचेवाडी रस्त्यावर असलेल्या नाल्यावर गणपती विसर्जना दरम्यान मुर्ती ढकलतेवेळी  पाण्याच्या प्रवाहात हा तरुण वाहुन गेला. उपस्थित नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने त्याला यश आलं नाही. लोकांनी त्यांचा शोध घेतला मात्र अजुनही थांगपत्ता लागला नाही. त्यांच्या मागे पत्नी व तीन मुली आहेत. सध्या गेल्या काही दिवसांपासून परिसरात चांगला पाऊस पडत असल्याने नदी नाले दुथडी वाहत आहेत. मराठवाड्यात नांदेडजवळही  गणेश  विसर्जनाच्या वेळी  खदानीत बुडून एका भाविकांचा मृत्यू झाला. शशिकांत कोडगीरवार असं त्या युवकाचं नाव असून तो 21 वर्षांचा होता.  हदगाव तालुक्यातील तामसा गावातली ही घटना आहे. गावकऱ्यांनी त्याचा  मृतदेह खदानीबाहेर काढला.

मिरवणुकीत चंद्रकांत खैरे आणि अतुल सावेंनी धरला ठेका, पाहा हा VIDEO

नांदेड विमानतळावर घसरलं विमान

अवयव घेऊन जाण्यासाठी आलेले चार्टर्ड विमान धावपट्टीवरून घसरले. विमान धावपट्टीवरून थेट बाजूच्या गवतात शिरले. विमानातील डॉक्टरांचे पथक, पायलट, को पायलट होते. सगळे थोडक्यात बचावले. बुधवारी रात्री 12 वाजता ही घटना घडली. यावेळी पाऊस सुरू होता.

मिळालेली माहिती अशी की, ब्रेन डेड झालेल्या तरुणाचे अवयव नेण्यासाठी मुंबईहून एक एअर अॅब्युलन्स आणि एक चार्टर्ड विमान नांदेडला आले होते. एअर अॅब्युलन्स सुखरूप उतरले. परंतु चार्टर्ड विमान लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरले. विमान थेट धावपट्टीच्या बाजूला असलेल्या गवतात शिरले आणि चिखलात फसले. अपघात घडताच विमानतळावरील कर्मचारी अधिकारी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या विमानात असलेले काही डॉक्टर, पायलट, को पायलट यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. नंतर क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त विमान चिखलातून बाहेर काढण्यात आले.

Loading...

राष्ट्रवादी सोडणाऱ्या भास्कर जाधवांविरोधात जिल्हाध्यक्ष आक्रमक, सडकून टीका

दरम्यान, याबाबत विमानतळ अधिकाऱ्यांकडून अत्यंत गोपनियता पाळली जात आहे. विमानाचा अपघात नेमका कसा झाला. याबाबत अधिकृत माहिती अद्याप समजू शकली नाही. या 2 विमानांच्या मदतीने मुंबईतील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये हृदय तर अपोलो हॉस्पिटलमध्ये लिव्हर नेले जाणार होते. दुर्दैवाने हे विमाने नांदेडला पोहोण्याआधीच अवयवदाता ओम काळे (वय-22) याची प्राणज्योत मालवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2019 05:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...