उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी फडणवीस वापरणार 'हे' अस्त्र!

उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी फडणवीस वापरणार 'हे' अस्त्र!

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन भिन्न विचारसरणी असलेल्या पक्षांचं हे सरकार असल्याने त्यांच्यात मतभेद आहेत हे आता काही नवं राहिलेलं नाही. त्याचाच फायदा घेत भाजप आक्रमक होणार आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, नागपूर 15 डिसेंबर : विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात उद्यापासून (सोमवार 16 डिसेंबर) सुरू होतंय. हे अधिवेशन आठवडाभर चालणार आहे. नागपूर अधिवेशन हे राजकीय दृष्ट्या कायम वादळी आणि खळबळजनक ठरलं आहे. त्यामुळे हे अधिवेशन कसं पार पडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन भिन्न विचारसरणी असलेल्या पक्षांचं हे सरकार असल्याने त्यांच्यात मतभेद आहेत हे आता काही नवं राहिलेलं नाही. त्यातच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्यावरून वाद निर्माण झालाय. त्याचा फायदा घेत उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी फडणवीसांनी रणनीती तयार केली असून त्याचे पडसाद आता विधिमंडळात बघायला मिळणार आहेत.

'झुकली रे झुकली.. मराठी बाणा सांगणारी शिवसेना काँग्रेससमोर झुकली'

त्याचाच एक भाग म्हणून, सावरकरांच्या मुद्दा हा राज्यभर तापविण्याची योजना भाजपने आखली आहे. भाजप राज्यभर 'मी सावरकर, आम्ही सगळे सावरकर' कँपेन करणार आहे. उद्या विधिमंडळातही भाजप आक्रमकपणे सावरकरांचा मुद्दा मांडणार असून त्यावरून वादळ होण्याची शक्यता आहे. याआधी खासदार संजय राऊत यांनी सावरकरांच्या मुद्यांवर तडजोड नाही असं काँग्रेसला सुनावलं.

त्याचबरोबर सावरकर हे महान देशभक्त होते. आम्ही नेहरूंना, गांधी मानतो, तुम्ही सावरकरांना माना असं म्हटलं होतं.  काँग्रेस-शिवसेनेच्या या मतभेदांचा फायदा घेत दोन्ही पक्षांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून होण्याची शक्यता आहे.

अजित पवार पुन्हा फॉर्मात... एका दिवसात तब्बल तीन मेळावे, आमदारांना दिला 'दम'

सरकार 50 वर्ष चालेल

अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आज नागपुरात आगमन झालं. मुख्यमंत्री म्हणून ठाकरे हे पहिल्यांदाच नागपुरमध्ये येत असल्याने शिवसैनिकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. मुख्यमंत्र्यांसोबतच सर्व सहाही मंत्री नागपुरात दाखल झाले आहेत. ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतरचं हे पहिलंच अधिवेशन असल्याने सक्षम असलेल्या भाजपसारख्या विरोधीपक्षाला सरकारला सामोरं जावं लागणार आहे. नागपुरमध्ये आल्यानंतर ठाकरे यांनी एका जाहीरसभेलाही संबोधीत केलं. त्यावेळी त्यांनी भाजपच्या टीकेले उत्तर दिलं.

अजित पवार पुन्हा फॉर्मात... एका दिवसात तब्बल तीन मेळावे, आमदारांना दिला 'दम'

नागपुर हे देवेंद्र फडणवीसांचं गाव आणि बालेकिल्ला त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे यांचा सत्कारही करण्यात आला. हे सरकार फार काळ टिकणार नाही असं भाजपतर्फे सांगितलं जातं त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या सरकारची खरी सुरुवात नागपुरातून होत आहे. हे सरकार फक्त पाचच नाहीतर पुढची पंचवीस आणि पन्नास वर्षही टिकणार आहे. कारण आम्हाला जनता जनादर्नाला पाठिंबा आहे. जनतेचा जर पाठिंबा असेल तर कुणाचीही चिंता करण्याची गरज नाही असंही ठाकरे म्हणाले.

 

Published by: Ajay Kautikwar
First published: December 15, 2019, 5:48 PM IST

ताज्या बातम्या