नागपूर शहरात तब्बल 29 शाळांमध्ये आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, पालकांमध्ये भीती

नागपूर शहरात तब्बल 29 शाळांमध्ये आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, पालकांमध्ये भीती

नागपूर शहरात यावर्षी डेंग्यूचे 69 रुग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधिक लहान मुले आणि 15 वर्षांच्या आतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

  • Share this:

हर्षल महाजन,(प्रतिनिधी)

नागपूर,20 सप्टेंबर: शहरातील तब्बल 29 शाळांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या शाळांना नोटीस बजावण्यात आली आहे. पण नागपुरातील या शाळा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत आहेत का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.

राम मनोहर लोहिया शाळेतील या डेंग्यूच्या अळ्या...

शाळेच्या छतावर साचलेल्या पाण्यात हजारोच्या संख्येने डेंग्यूच्या अळ्या आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

नागपूर शहरात एक-दोन नाही, तर तब्बल 29 शाळांमध्ये शाळेत अशाप्रकारच्या डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. एकट्या राम मनोहर शाळेत 250 विद्यार्थी शिक्षण घेतात तर 29 शाळेत जवळपास पाच हजार विद्यार्थी शिकतात. डेंग्यूच्या अळ्या असलेल्या या शाळांमध्ये रोज हजारो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातला जात आहे. नागपूर महानगरपालिकेने या सर्व शाळांना नोटीस बजावली आहे.

नागपूर शहरात यावर्षी डेंग्यूचे 69 रुग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधिक लहान मुले आणि 15 वर्षांच्या आतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याचे मूळ आता शाळांमध्ये सापडले आहे. शाळांमधील डेंग्यूच्या अळ्यांमुळे मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महापालिकेच्या हिवताव व हत्तीपाय रोग विभागाच्या अधिकारी जयश्री थोटे यांनी सांगितले की, डेंग्यूवर अद्याप अॅण्टीबायोटिक किंवा अॅण्टीव्हायरल औषध नाही. डेंग्यूला कारणीभूत असलेला एडीस डास हा कूलर्स, पाण्याच्या टाक्या, ड्रम, कुंड्या, डबके व पावसाच्या साचलेल्या पाण्यात आढळतो. परंतु शहरातील काही शाळा याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. अशा शाळांवर दंडात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाकडे पाठवण्यात आल्या आहे.

CCTV VIDEO: मी बिल का देऊ म्हणत तरुणाची हॉटेल मालकाला बेदम मारहाण

First published: September 20, 2019, 4:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading