धक्कादायक.. लाच म्हणून पोलिसांनी शरीर सुखासाठी केली चक्क तीन मुलींची मागणी

धक्कादायक.. लाच म्हणून पोलिसांनी शरीर सुखासाठी केली चक्क तीन मुलींची मागणी

नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा शाखेतील दोन पोलिसांनी चक्क लाच म्हणून शरीर सुखासाठी तीन मुलींची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • Share this:

हर्षल महाजन, (प्रतिनिधी)

नागपूर, 5 सप्टेंबर: लाच म्हणून पैसे, दागिने, भेटवस्तू... हे प्रकार तुम्हा-आम्हाला माहीत आहे. पण नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा शाखेतील दोन पोलिसांनी चक्क लाच म्हणून शरीर सुखासाठी तीन मुलींची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या धक्कादायक मागणीचे पुरावे हाती आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी (एसीबी) दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात एक अनोखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनीच लाच म्हणून तीन मुलींची मागणी केली होती. सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेवरील कारवाई थांबवण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच आणि शरीर सुखासाठी तीन मुली, अशी मागणी करण्यात आली होती. या धक्कादायक तक्रारीनंतर एसीबीच्या पोलीस अधीक्षकांनी सापळा रचला आणि भंडारा एसीबीच्या टीमच्या मदतीने दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. यात नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातील दोन पोलीस कर्मचारी सहभागी होते. एसआय दामोधर राजुरकर आणि हवालदार शितलाप्रसाद मिश्रा अशी आरोपी पोलिसांची नावे आहेत.

काय आहे प्रकरण?

29 ऑगस्ट रोजी स्पा सेंटर चालवणाऱ्या संबंधित व्यक्तीबद्दल, त्यासाठी भंडाऱ्यावरून एक टीम बोलवण्यात आली. तेव्हा पडताळणीमध्ये सामाजिक सुरक्षा विभागाचे दामोधर राजुरकर व शितलाप्रसाद मिश्रा यांनी तक्रारदार महिलेकडे स्पष्ठपणे रोख 35 हजार रुपयांसह सुखासाठी तीन मुलींची मागणी केली केल्याचे आढळून आले. NPDA ची कारवाई न करण्यासाठी प्रथम 35 हजारांची मागणी केली, पण तडजोड करून अंतिम 25 हजार स्वीकारण्याची तयारी दर्शवली. यासह शरीर सुखासाठी 3 मुलींची मागणी केली. आरोपींना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आयुक्त (ACB)रश्मी नांदेडकर यांनी दिली आहे.

VIDEO : दुकानाबाहेर साड्या पाहत होत्या महिला, बैलाने मागून येऊन दिली धडक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2019 12:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading