Home /News /maharashtra /

लॉकडाऊनमध्ये पहिली पिकनिक ठरली अखेरची, मेळघाटात 3 तरुणांचा जागीच मृत्यू

लॉकडाऊनमध्ये पहिली पिकनिक ठरली अखेरची, मेळघाटात 3 तरुणांचा जागीच मृत्यू

अमरावती जिल्ह्यामध्ये हा भीषण अपघात घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांना पाचारण करण्यात आलं आहे.

अमरावती, 03 सप्टेंबर : आज पहाटे एका भीषण अपघाताची माहिती समोर येत आहे. क्रुझर गाडी झाडावर आदळल्याने एकाच क्षणात तिघांचा मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये हा भीषण अपघात घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांना पाचारण करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेळघाटात परतवाडा धारणी मार्गावर क्रूझर गाडी झाडावर आदळली. या भीषण अपघातामध्ये 3 पर्यटकांवर काळाचा घाला तर 4 जण गंभीर जखमी आहेत. पर्यटक हे माळघाट फिरण्यासाठी गेले होते. घरी परतत असताना त्यांचा अपघात झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक हे अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू इथल्या गावातील असल्याची माहिती समोर येत आहे. PM मोदींच्या वैयक्तिक वेबसाईटचं ट्विटर अकाऊंट हॅक, हॅकरने मागितले चक्क बिटकॉइन सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे अपघातातील सर्व युवक हे 22 ते 24 वयोगटातील आहेत. लॉकडाऊन दरम्यान ते सगळे फिरण्यासाठी गेले होते. पण परतत असताना त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आणि यामध्ये 3 मित्रांनी आपला जीव गमावला. कोरोना लॉकडाऊनमध्ये अचानक का आणि कसं वाढलं तुमचं वजन? सर्वेक्षणात समोर आली कारणं घटनेची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी जखमींना तातडीने उपचारासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून 3 मृतदेह ताब्यात घेतलं असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर अपघाताचा पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published:

पुढील बातम्या