मध्यरात्री संभोग करण्यास पत्नीने दिला नकार.. CRPF च्या जवानाने डोक्यात घातली बॅट

मध्यरात्री संभोग करण्यास पत्नीने दिला नकार.. CRPF च्या जवानाने डोक्यात घातली बॅट

आरोपी जवान CRPFमध्ये जम्मू-काश्मीर येथे तैनात आहे. तीन दिवसांपूर्वी तो घरी आला आहे. मंगळवारी रात्री जवान व त्याच्या पत्नीने सोबत जेवण केले. त्यानंतर दोघे झोपण्यासाठी बेडरुममध्ये गेले.

  • Share this:

नागपूर,11 सप्टेंबर: 13 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर स्मशानभूमीत चौघांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची घटना ताजी असतानी आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यरात्री संभोग करण्यास नकार दिल्याने केंद्रीय राखीव पोलिस दलातील (CRPF) 45 वर्षीय जवानाने 35 वर्षाच्या पत्नीच्या डोक्यावर बॅटने जोरदार प्रहार केला. या घटनेत महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलिस स्टेशनमध्ये आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ही घटना शांतीनगरमधील प्रेमनगर भागात मंगळवारी (10 सप्टेंबर) मध्यरात्री घडली. आरोपी जवान CRPFमध्ये जम्मू-काश्मीर येथे तैनात आहे. तीन दिवसांपूर्वी तो घरी आला आहे. मंगळवारी रात्री जवान व त्याच्या पत्नीने सोबत जेवण केले. त्यानंतर दोघे झोपण्यासाठी बेडरुममध्ये गेले. जवानाने पत्नीकडे शरीरसंबंध प्रस्थापित करण्याची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. त्यावरून संतापलेल्या जवानाने पत्नीच्या डोक्यात बॅट घातली. मात्र, तिने वेळीच पतीला प्रतिकार केल्याने पत्नीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. महिलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तहसील पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून हे प्रकरण शांतीनगर पोलिसांकडे वर्ग केले आहे. शांतीनगर पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

13 वर्षांच्या मुलीवर केला आळीपाळीने बलात्कार

13 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर स्मशानभूमीत चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा परिसरात ही घटना आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

दोन आरोपी विधिसंघर्षग्रस्त मुले..

याप्रकरणी पोलिसांनी अमित ठाकूर (वय-18), बलवंत गोंड (वय-22) यांच्यासह दोन मुलांवर गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी अमित ठाकूरला अटक करण्यात आली, तर बलवंत गोंड अद्याप फरार आहे. दोन आरोपी विधिसंघर्षग्रस्त मुले असल्याची माहिती मिळाली आहे.

शौचास गावाबाहेर गेली होती पीडिता..

मिळालेली माहिती अशी की, रविवारी (8 सप्टेंबर) रात्री पीडित मुलगी शौचास गावाबाहेर गेली होती. तेथून परतत असताना गावातील चौघांनी तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला स्मशानभूमीत नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. नंतर तिला गावात आणून सोडले.

वाहतूक पोलिसाची मुजोरी! सर्वसामान्यावर दमदाटी करत मारली लाथ VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2019 04:31 PM IST

ताज्या बातम्या