गृहमंत्र्यांचं नागपूर हादरलं, 24 तासात झाली तिघांची हत्या

गृहमंत्र्यांचं नागपूर हादरलं, 24 तासात झाली तिघांची हत्या

खूनाच्या तीन घटना घडल्याने शहर हादरलं असून नव्या गृहमंत्र्यांसमोर नवं आव्हान निर्माण झालंय.

  • Share this:

नागपूर 08 जानेवारी : राज्याचे गृहमंत्रीम्हणून राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी नुकताच कार्यभार स्वीकारलाय. या आधी पाच वर्ष तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रालय होतं. त्यामुळे नागपूर हे कायम विविध गुन्ह्यांसाठी चर्चेत राहिलं. आता देशमुख यांनी कार्यभार स्वीकारून काही दिवसच झाले आहेत. असं असताना शहरात गेल्या 24 तासांमध्ये खूनाच्या तीन घटना घडल्याने शहर हादरलं असून नव्या गृहमंत्र्यांसमोर नवं आव्हान निर्माण झालंय. एक दिवसात तिघांची हत्या झाल्याने पुन्हा गुन्हेगारी जगत डोकं वर काढू लागलंय का असा प्रश्न निर्माण झालाय.

पहिली घटना - नागपुर जिल्ह्याच्या कन्हान येथे घडलीय. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असलेल्या उमेदवाराच्या नातेवाईकाची चाकू ने भोसकून हत्या करण्यात आलीय. संजू खडसे असे मृतक तरुणाचं नाव आहे. संजू आणि आरोपी एका बार मध्ये मद्यपान करत असताना बाजूच्या टेबल वर बसलेल्या तिघांशी त्यांचा वाद झाला होता. त्यातूनच संजूची हत्या करण्यात आलीय. संजूची हत्या राजकीय वादातून झालेली नाही हे पोलिसांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे. पोलिसांनी संजूच्या हत्ये प्रकरणी दोघांना अटक केलीय.

दुसरी घटना- नागपुर शहराच्या यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राणी दुर्गावती चौकातील एक सावजी हॉटेल मध्ये घडली आहे. मंगळवारी रात्री समीर हा वनदेवीनगर भागात एकटा असल्याची माहिती मिळताच मारेकरी त्याचा पाठलाग करायला लागले. बचावासाठी समीर आर. के. सावजी भोजनालयात घुसला. प्रवीणचे साथीदारही त्याच्या मागोमाग भोजनालयात घुसले. चाकूने सपासप वार करून समीरची हत्या करण्यात आलीय.

जोडप्याचा वाद आणि तिसऱ्याचं मरण, पतीने मधे आलेल्या कार्यकर्त्यालाच केलं ठार

या घटनेत समीरचा घटनास्थळीच मृत्यू झाल्यानंतर आरोपी घटनास्थळा वरून पसार झाले आहेत. मृत समीर शेख हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी समीरच्या खुनाचा तपास सुरू केला आहे.

वृद्ध दाम्पत्याने मुलासारखं समजून सांभाळलं, त्यानेच विश्वासघात करून गळा घोटला

तिसरी घटना- वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलीय. हिमांशू ढेंगे नावाच्या तरुणाची दगडाने ठेचून अज्ञात आरोपींनी हत्या केली. हिमांशूची ओळख पटू नये यासाठी आरोपींने त्याच्या तोंडावर दगड टाकून त्याचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मृतकाची ओळख हिमांशू म्हणून झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केलाय.

समीर आणि हिमांशू या दोघांची हत्या तर अवघ्या दीड तासात झाल्या आहेत. या तीन हत्यांमुळे शहरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गृह जिल्ह्यातच पुन्हा गुन्हेगारी घटना वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2020 07:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading