YouTube वर घरफोडीचे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रेमीयुगुलाचा 'प्रताप' पाहून पोलिसही झाले थक्क

YouTube वर घरफोडीचे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रेमीयुगुलाचा 'प्रताप' पाहून पोलिसही झाले थक्क

Youtube वर चोरी आणि घरफोडीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रॅक्टिकल करण्यासाठी शैलेश आणि प्रियाने स्वतःच्याच घरी चोरी केली.

  • Share this:

प्रशांत मोहिते,(प्रतिनिधी)

नागपूर,1 नोव्हेंबर:'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या उच्चशिक्षित प्रेमीयुगुलाला पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात मोठ्या शिताफीने अटक केली आहे. Youtube वरुन प्रशिक्षण घेऊन या प्रेमीयुगुलाने लागोपाठ 7 घरफोड्या केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसही थक्क झाले आहेत. शैलेश आणि प्रिया हे आलिशान बंगल्यात राहातात आणि

कारमध्ये बसून घरफोड्या करत होते. शैलेश डुंभरेने एमबीए केले असून प्रिया ही बीए फाईन आर्ट्सची विद्यार्थिनी आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात दोघांनी गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

Youtubeवर घेतले चोरीचे प्रशिक्षण..

शैलेश डुंभरे हा काही महिन्यांपूर्वी एका कॉस्मेटिक्स कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करत होता. मात्र, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात त्याने नोकरी सोडून गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारला. शैलेशने चोऱ्या, घरफोड्या कशा कराव्या याचे प्रशिक्षण Youtube वरुन घेतले. धक्कादायक म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियालाही त्याने या कामात सहभागी करून घेतले. विशेष म्हणजे दोघे चोरी करताना नवी कोरी कार वापरत होते. दोघे कारमध्ये बसून पश्चिम नागपुरातील विविध वस्त्यांमध्ये घरफोड्या करत होते. कोणाला संशय येऊ नये म्हणून दोघांनी नागपूरच्या गोरेवाडा परिसरात एक बंगला भाड्याने घेतला होता. विशेष म्हणजे दोघे उच्चशिक्षित असल्याने घर मालकालाही त्यांच्यावर कधी संशय आला नाही.

प्रॅक्टिकल म्हणून स्वतःच्याच घरात केली चोरी..

Youtube वर चोरी आणि घरफोडीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रॅक्टिकल करण्यासाठी शैलेश आणि प्रियाने स्वतःच्याच घरी चोरी केली. चोरीचा पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी शहरातील विविध परिसरात घरफोडी करायला सुरुवात केली. आत्मविश्वास वाढल्याने दोघांनी लागोपाठ तब्बल सात घरफोडी केल्या. लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरला.

भगव्या रंगाची कारने केला घात...

मानकापूरसह परिसरात अनेक चोरीच्या घटना समोर आल्याने पोलिसांची झोप उडाली होती. अनेक चोऱ्यांमध्ये भगव्या रंगाच्या गाडीचा उल्लेख आल्याने पोलिसांनी भगव्या रंगाच्या सर्व गाड्यांची यादी तयार करून त्यांच्या मालकांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. त्यात शैलेश आणि प्रियाचाही समावेश होता. पोलिसांनी शैलेश व प्रियावर पाळत ठेवली. एका रात्री दोघे कारमधून रात्री चोरीच्या हेतूने बंगल्याबाहेर पडले. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्हा कबूल केला. दोघांनी सात ठिकाणी घरफोड्या करून लाखोंचा मुद्देमाल चोरल्याची कबुली दिली.

VIDEO : सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत सेनेबद्दल काय निर्णय झाला? बाळासाहेब थोरात म्हणाले...

First published: November 1, 2019, 9:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading