Home /News /maharashtra /

मृत्यू झाल्यानंतर महिलेला अंत्यसंस्कारासाठी स्मशानात नेल्यानंतर समोर आला विचित्र प्रकार

मृत्यू झाल्यानंतर महिलेला अंत्यसंस्कारासाठी स्मशानात नेल्यानंतर समोर आला विचित्र प्रकार

सावळ तालुक्यातील साकेगाव जवळ असलेल्या गोदावरी कोविड रूग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे .

जळगाव, 4 सप्टेंबर : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आरोग्य व्यवस्थेचा ढिसाळपणा समोर येत आहे. बेड आणि रुग्णवाहिकेअभावी रुग्णांना जीव गमवावा लागत असल्याच्या घटना समोर आल्याने संताप व्यक्त करण्यात आला. मात्र अशातच जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकेगाव जवळ असलेल्या गोदावरी कोविड रूग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे . भुसावळ तालुक्यातील खडका येथील मुस्लीम कॉलनी शहरातील रजा नगर मुस्लीम कॉलनी येथील फातेमा बी अब्दुल समद पिंजारी या महिलेचा 3 सप्टेंबर रोजी रात्री गोदावरी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर आज सकाळी रुग्णालयातून त्यांचा मृत्यूदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र या महिलेला अंत्यसंस्कारासाठी स्मशानात नेल्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला. सदरील महिलेला अंतिम संस्कारासाठी भुसावळ येथील कब्रस्तानमध्ये आणले असता तो मृतदेह दुसऱ्याच महिलेचा असल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले. संबंधित मृतदेह हा वच्‍छलाबाई सुरेश सूर्यवंशी राहणार दादावाडी जळगाव येथील महिलेचा असल्याचे समजले. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. एकीकडे रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असताना हा प्रकार समोर आल्यानंतर सदर रुग्णाच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या गंभीर घटनेची दखल घेऊन प्रशासनाकडून संबंधितांवर कारवाई केली जाते का, हे पाहावं लागेल. दरम्यान, कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा धक्कादायक प्रकार नुकताच कोल्हापूरमधील एका खासगी रुग्णालयात घडला होता. सदर कोरोनाबाधित महिलेचे दागिने चोरीला गेल्याचं समोर आलं. ही बाब लक्षात येताच महिलेच्या नातेवाईकांची पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या