Home /News /maharashtra /

Good News पुण्यात 30 माकडांवर होणार कोरोना लशीचा प्रयोग

Good News पुण्यात 30 माकडांवर होणार कोरोना लशीचा प्रयोग

सार्स कोव्हिड-2 ' ही लस तात्काळ विकसित करण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आलं होतं. त्यात प्रगती झाली आहे.

यवतमाळ 3 जून: करोना व्हायरसवरची लस शोधण्याच्या प्रयत्नांना मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. पुण्यातली राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था यासाठी प्रयोग करत असून त्यांनी यात चांगली प्रगती केली आहे. ' सार्स कोव्हिड-2 ' ही लस तात्काळ विकसित करण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आलं होतं. त्यात प्रगती झाली असून संस्थेला लशीच्या प्रयोगासाठी 30 माकडांची गरज आहे. वनविभाग ही माकडं संस्थेला पुरविणार आहे. संस्थेने याबाबत एक पत्र वनविभागाला दिलं होतं. त्याला मंजूरी देण्यात आल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. ही माकडे राज्याच्या हद्दीतील देण्यात येणार असून करोना प्रतिबंधात्मक लशीचा सर्वप्रथम प्रयोग या माकडांवर करण्यात येणार आहे. काही अटींवर ही परवानगी देण्यात येत असल्याचं वनमंत्र्यांनी सांगितलं. माकडांची योग्य काळजी घेण्याची हमी संस्थेने दिली आहे. सध्या राज्यात करोना विषाणूमुळे होत असलेला प्रादुर्भाव व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता या संशोधन प्रकल्पाला तातडीने परवानगी देण्याबाबत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी 30 मे रोजी पत्र देऊन शासनास मान्यता देण्याची शिफारस केली होती. त्यानुसार ही माकडे तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. याप्रकरणी अनुभवी मनुष्यबळामार्फत या माकडांना पकडणे,  कुशलतेने हाताळणे,  सुरक्षितपणे बाळगणे आदी अटीच्या अधीन राहून ही मान्यता देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
Published by:Priyanka Gawde
First published:

Tags: Coronavirus, Pune

पुढील बातम्या