अपघातात कारचा झाला चुराडा, दोघांचाही जागीच मृत्यू

अपघातात कारचा झाला चुराडा, दोघांचाही जागीच मृत्यू

समोरून येणाऱ्या कंटेनरने कारला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की त्यात कारचा पूर्ण चुराडा झाला. तर कंटनरचं फक्त पुढच्या भागाचं नुकसान झालं.

  • Share this:

नरेंद्र मते,  वर्धा 20 फेब्रुवारी : नागपूर अमरावती महामार्गावर आज सकाळी कंटेनर आणि कारची भीषण धडक झाली. या अपघातात कारमध्ये असलेल्या दोनही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. नागपूर अमरावती महामार्गावरील तळेगाव जवळील खडका शिवारातील ही घटना आहे. मृतकांमध्ये अमरावतीच्या जात पडताळणी विभागातील जिल्हा संशोधन विभागाचे जिल्हा संशोधन अधिकारी अनंत मुसळे यांचा समावेश आहे. अपघातातल्या दुसऱ्या मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. धडक एवढी भीषण होती की कारचा घटनास्थळावरच चुराडा झाला. अपघातानंतर कंटेनरचा चालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघातानंतर चालकाने कंटेनर घटनास्थळावरून काही अंतरावर सोडून पळ काढला.

पुढून येणाऱ्या कंटेनरने कारला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की त्यात कारचा पूर्ण चुराडा झाला. तर कंटनरचं फक्त पुढच्या भागाचं नुकसान झालं. तर चंद्रपूरमध्ये झालेल्या एका अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला.

गाडी वेगावर नियंत्रण ठेवा नाहीतर जीवाशी मुकाल अशा कितीही सुचना दिल्या तरी गाड्यांचा वेग काही कमी होत नाही. चंद्रपूरमध्ये भरधाव वेगात असणाऱ्या एका कारला भीषण अपघाता झाला आहे. या अपघातामध्ये तब्बल 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. चंद्रपूरमधील मूल तालुक्यातील केसलाघाट इथे हा भीषण अपघात झाला आहे.

भाजपच्या माजी आमदाराचे पंचतारांकित हॉटेल उडवून देण्याची 'लश्कर-ए-तोयबा'ची धमकी

कारचा भरधाव वेगात असल्यामुळे चालकाला कंट्रोल करताना आली नाही. त्यामुळे अपघात झाला. यामध्ये 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 7 जण गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेली स्कॉर्पिओ गाडी मार्गावर नादुरुस्त उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. गाडीचा वेग इतका होता की यामध्ये निम्मी कार ही ट्रकखाली शिरली आहे.

शिवजयंतीच्या मिरवणुकीला औरंगाबादमध्ये गालबोट, तरुणाची भोसकून हत्या

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया इथे देवदर्शनाला गेले असता परत येत असताना चंद्रपूर इथे त्यांच्या गाडीला अपघात झाला. मृतांमध्ये सर्वजण हे चंद्रपूरला राहणारे असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या अपघातामध्ये मृत झालेल्यांपैकी एक दीड वर्षाचा मुलगा आहे. मृतांमध्ये 2 पुरुष 3 महिला आणि एक लहान मुलगा आहे.

First published: February 20, 2020, 11:17 AM IST
Tags: accident

ताज्या बातम्या