सांगली पाण्यात बुडत असताना सरकार मौज मस्ती करत होतं - थोरात

सांगली पाण्यात बुडत असताना सरकार मौज मस्ती करत होतं - थोरात

हे सरकार केवळ चार भांडवल दारांचं सरकार आहे 2005-06 साली काँग्रेस सरकारने नियोजन केलं म्हणून पूर परिस्थिती नियंत्रणात होती. नंतर नियोजनाचे बारा वाजले

  • Share this:

संजय शेंडे,अमरावती 26 ऑगस्ट : भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रेनंतर काँग्रेसची आजपासून महापर्दाफाश यात्रा सुरू झाली. अमरावती इथं झालेल्या जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. महापूराची परिस्थिती हाताळण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरलं असून ज्या दिवशीत सांगली पाण्यात बुडत होती, ज्या दिवशी ब्रम्हणाळ्यात होडी बुडाली त्या दिवशी हे सरकार मौज मजा करत होतं असा गंभीर आरोप त्यांनी केला. हे सरकार घोषणा करण्यात पटाईत असून शेतकऱ्यांना अजुनही विमा  मिळाला नाही असा आरोही त्यांनी केला.

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, हे सरकार केवळ चार भांडवल दारांचं सरकार आहे 2005-06 साली काँग्रेस सरकारने नियोजन केलं म्हणून पूर परिस्थिती नियंत्रणात होती. नंतर नियोजनाचे बारा वाजले अशी टीकाही त्यांनी केली. सगळे वाहन उद्योग मंदावले आहेत. मंदीचा विळखा वाढतोय. वस्त्रोद्योग डबघाईला गेला, मात्र सरकार काहीच करत नाही अशी टीकाही त्यांनी केला.

माजी खासदार नाना पटोले यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले,

VIDEO: मराठवाड्यातील दुष्काळमुक्तीसाठी धनंजय मुंडेंचं वैद्यनाथाला साकडं

मुख्यमंत्री कार्यालयातून दर महिन्याला 50 कोटी रुपये संघ कार्यकर्त्यांवर खर्च केले जात आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने महापर्दाफाश यात्रा काढली आहे. अमरावतीतून या यात्रेला सुरुवात होताच नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्यातूनच महाजनादेश यात्रेला सुरुवात केली. त्यानंतर आता काँग्रेसच्या वतीने आजपासून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्या नेतृत्वात 'महापर्दाफाश' यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे.

हायकोर्टासमोर काळी फित बांधून आंदोलनाचा इशारा देणं 'या' नेत्याला पडलं महागात

'गिरीश महाजन तर जोकरमंत्री'

सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरावरून नाना पटोले यांनी भाजप नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर तोंडसुख घेतलं आहे. 'अलमट्टी धरणामुळे सांगली, कोल्हापूरवर पुराची स्थिती ओढवली. गिरीश महाजन हे जोकरमंत्री आहेत.' अशी जहरी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

शिवसेनेची अडचण होणार? मित्रपक्षांच्या मदतीने भाजप सोडणार 'इतक्याच' जागा

गिरीश महाजन यांनी महापुरादरम्यान सेल्फी व्हिडिओ काढल्याने त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. हाच मुद्दा पकडत महापर्दाफाश यात्रेत नाना पटोले यांनी महाजनांवर जोरदार टीका केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 03:21 PM IST

ताज्या बातम्या