मुंबई 03 ऑक्टोंबर : काँग्रेसने आपली तिसरी यादी जाहीर केलीय. या तिसऱ्या यादीत 19 जणांचा समावेश आहे. काँग्रेसने डाव खेळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध माजी आमदार आशिष देशमुख यांना उमेदवारी दिलीय. आशीष देशमुख 2014मध्ये भाजपच्या तिकीटवर निवडून आले होते. त्यानंतर मतभेद झाल्याने त्यांनी भाजपचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसशी घरोबा केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांविरुद्ध तगडा उमेदवार देतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. नाना पटोले यांचंही नाव चर्चेत होतं. मात्र शेवटी आशीष देशमुख यांना काँग्रेसने आखाड्यात उतरवलं.
अशी आहे काँग्रेसची यादी
नागपूर दक्षिण-पश्चिम - आशिष देशमुख
नंदूरबार ST - उदेसिंग पडवी
साक्री ST - डी. एस. अहिरे
अकोला पश्चिम - साजिद खान मन्नन खान पठाण
अमरावती - शुभा खोडे
दर्यापूर SC - बळवंत वानखेडे
कामठी - सुरेश भोयर
रामटेक - उदयसिंह यादव
गोंदिया - अमर वरदे
चंद्रपूर SC - महेश मेंढे
हदगाव - माधवराव पवार
सिल्लोड - खैसर आझार
ओवळा माजीवाडा - विक्रांत चव्हाण
कोपरी पांचपाखाडी - हरिलाल भोईर
वर्सोवा - बलदेव खोसा
घाटकोपर पश्चिम - आनंद शुक्ला
श्रीरामपूर SC - लहू कानडे
कणकवली - सुशील अमृतराव राणे
हातकणंगले SC - राजू आवळे
सिल्लोडमधून आधी घोषीत केलेला उमेदवार आता बदलला आहे. तर कणकवलीतून सुशील राणेंना काँग्रेसने उमेदवारी दिलीय. सिल्लोड आणि नंदुरबार येथे स्थानिक विरोध पाहून परत नवीन उमेदवार घोषित केले. उद्या उमेदवारी अर्जासाठी शेवटचा दिवस आहे.
मुंबई काँग्रेसला हादरा
मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी बंडाचा झेंडा फडकवलाय. पक्षनेतृत्वाचं जे माझ्यासोबत वागणं आहे ते योग्य नसून आता जास्त काळ सहन होणार नाही. त्यामुळे पक्षाचा निरोप घेण्याची वेळ आलीय असंही त्यांनी ट्विट करून स्पष्ट केलं. विधानसभा निवडणुकीसाठी मी फक्त एक नाव सुचवलं होतं आणि पक्षाने ते नाकारलं आहे. हे अतिशय चूकीचं असून मी पक्षाच्या प्रचारातही सहभागी होणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीला आता फक्त काही दिवस राहिले असताना त्यांच्या या बंडामुळे काँग्रेला मोठा हादरा बसलाय. आधीच काँग्रेस पक्षाला गळती लागली होती. त्यामुळे अनेक मोठे नेते पक्षसोडून गेलेत अशी केविलवाणी अवस्था असताना आणखी एका नेत्याने बंड करण्यामुळे चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे.