उद्धव ठाकरेंची डिनर डिप्लोमसी, भाजपच्या आमदारांना स्नेहभोजनाचं निमंत्रण

उद्धव ठाकरेंची डिनर डिप्लोमसी, भाजपच्या आमदारांना स्नेहभोजनाचं निमंत्रण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या निमंत्रणाचा स्वीकार करून भाजपचे सदस्य भोजनाला जातात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

  • Share this:

नागपूर 18 डिसेंबर : नागपुर इथं सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन वादळी ठरलंय. आठवडाभर हे अधिवेशन चालणार आहे. ठाकरे सरकारचं हे पहिलच अधिवेशन असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना निमंत्रण मुख्यमंत्र्यांकडून पाठविण्यात येत आहे. मात्र त्याच बरोबर भाजपच्या आमदारांनाही या स्नेहभोजनाचं निमंत्रण पाठविण्यात येत असल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. भाजप आणि शिवसेनेचे गेल्या 30 वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सध्या त्यांच्यात दुरावा निर्माण झाला तरी जुने संबंध असल्याने हे निमंत्रण देण्यात आल्याचं बोललं जातंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या डिनर डिप्लोमसीमुळे मात्र राजकीय चर्चेला वेगळीच रंगत आलीय. नागपूर अधिवेशन हे राजकीय कामकाजाबरोबरच स्नेहभोजन आणि रात्रींच्या गप्पांसाठीही ओळखलं जातं त्यामुळे याकडे बघितलं जातंय. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या निमंत्रणाचा स्वीकार करून भाजपचे सदस्य जेवणाला जातात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

देवेंद्र फडणवीसांनी 'तो' VIDEO शेअर केल्याने पृथ्वीराज चव्हाण भडकले, जोरदार टीका

आज सभागृहात काय झालं?

विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही सभागृहात मोठा गोंधळ उडाला. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलायला उभा राहिलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' या दैनिकातील काही जुने संदर्भ वाचून दाखवले. सामना दैनिकातून शरद पवार यांच्यावर निवडणुकीआधी आक्रमक शब्दांत टीका करण्यात आली होती. त्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधून घेतलं.

'शरद पवार अफजल खान आहेत. शरद पावर महाराष्ट्राचे शत्रू आहेत. शरद पवार बकासूर आहेत,' अशा आशयाच्या सामनातील बातम्या देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवल्या. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक झाले. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावर हरकत घेतली. सभागृहात वर्तमानपत्र पुरावा म्हणून वाचता येत नाही, असं देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असताना म्हणाले होते, अशी आठवण धनंजय मुंडे यांनी करून दिली.

अमित शहांचा पुन्हा शिवसेनेवर हल्लाबोल, शरद पवारांबद्दलही केलं भाष्य

'ते' शब्द अध्यक्षांनी रेकॉर्डमधून वगळले

देवेंद्र फडणवीस यांनी सामनातून वाचून दाखवलेले शब्द महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्याचा अपमान करणारे आहेत, अशी भूमिका घेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेच्या रेकॉर्डमधून देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याबद्दल वाचून दाखवलेले शब्द वगळले. त्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलण्याची संधी देण्यात आली.

फडणवीसांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका

शिवसेना युतीतून बाहेर पडल्याची सल अजूनही देवेंद्र फडणवीस यांच्या मनातून कमी झालेली दिसत नाही. कारण याच मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 'उद्धव ठाकरे म्हणतात की मी बाळासाहेबांना वचन दिलं होतं की महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवेन. पण तुम्ही असा शब्द दिला होता का, की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिवावर मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन,' अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

 

First Published: Dec 18, 2019 03:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading