मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शरद पवार यांचे निकटवर्तीय, माजी आमदार आणि ज्येष्ठ समाजसेवक एकनाथराव साळवे यांचं निधन

शरद पवार यांचे निकटवर्तीय, माजी आमदार आणि ज्येष्ठ समाजसेवक एकनाथराव साळवे यांचं निधन

Former MLA Eknathrao Salve has passed away : अनेक नक्षल संबंधित खटल्यात नक्षलवाद्यांचे आणि आदिवासींचे वकील म्हणूनही त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांच्या पुढाकारामुळे अनेक अडचणी सोडविण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

चंद्रपूर, 13 मार्च : माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय, अॅड. एकनाथराव साळवे यांचं आज वयाच्या 91 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. एकनाथराव साळवे यांनी आज चंद्रपुरात राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अनेक राजकीय नेत्यांनी साळवे यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त केली आहे. एक समाजसेवक आपल्यातून गेला, अशी भावना अनेक नेते व्यक्त करीत आहेत.

1967 ते 1978 असे 2 टर्म चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार म्हणून त्यांनी काम केलं आहे. (close associate of Sharad Pawar Former MLA Eknathrao Salve has passed away)

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय होते. अनेक नक्षल संबंधित खटल्यात नक्षलवाद्यांचे आणि आदिवासींचे वकील म्हणूनही त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांच्या पुढाकारामुळे अनेक अडचणी सोडविण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 1992 साली तत्कालीन राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केल्यावर सरकार-नक्षली यांच्यात मध्यस्थी घडवून आत्राम यांची सोडवणूक करण्यात एकनाथराव साळवे यांचा मुख्य वाटा होता. (close associate of Sharad Pawar Former MLA Eknathrao Salve has passed away)

हे ही वाचा-हार्दिक पटेल यांनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

याशिवाय कायदा-नक्षलवाद यावर त्यांनी विपुल लेखन केलं असून याविषयासंबंधित पुस्तकही आहेत. "एन्काऊंटर" या कादंबरीमुळे त्यांचे नाव विशेष गाजले होते. जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील बामणी या मूळ गावी त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

First published:
top videos

    Tags: Chandrapur, Congress, Death, Friendship, Mla, NCP, Sharad pawar