'अमित शहा मुर्दाबाद'च्या घोषणा देत जाळल्या नागरिकत्व विधेयकाच्या प्रती

'अमित शहा मुर्दाबाद'च्या घोषणा देत जाळल्या नागरिकत्व विधेयकाच्या प्रती

पाकिस्तान,अपगाणिस्तान व बांगलादेश या तीन देशातील अल्पसंख्याक नागरिकांना भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे.

  • Share this:

संजय शेंडे,(प्रतिनिधी)

अमरावती, 12 डिसेंबर: संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर राज्यसभेत बुधवारी रात्री उशीरा शिक्कामोर्तब करण्यात आला. यानंतर देशात या धेयलाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. युवक काँग्रेसच्या वतीने गुरूवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयसमोर विधेयकच्या प्रति जाळून केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. 'अमित शहा मुर्दाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या. युवक काँग्रेस व मुस्लिम समुदायतील युवकानी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

नागरिकत्व विधेयक म्हणजे संविधानावर हल्ला आहे, आम्ही याचा तिव्र विरोध करतो. पाकिस्तान,अपगाणिस्तान व बांगलादेश या तीन देशातील अल्पसंख्याक नागरिकांना भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे. तर श्रीलंनकेतील तामिळ, मुस्लिमांनाही याचा लाभ मिळणार नाही.खऱ्या अर्थाने धर्माच्या नावावर भेदभाव करणारे आहे, अशी प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे अध्यक्ष पंकज मोरे यांनी यावेळी दिली आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक प्रचंड विरोधानंतरही लोकसभेपाठोपाठ अखेर राज्यसभेत मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने 125 मते पडली तर विधेयकाविरोधात 105 मते पडली. दरम्यान, लोकसभेत विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या शिवसेनेने राज्यसभेत मतदानावेळी सभात्याग करून आपला विरोध दर्शविला. राज्यसभेतही हे विधेयक मंजूर झाल्याने देशातील सर्व राज्यांमध्ये हे विधेयक लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागरिकत्व विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी या घटनेला ऐतिहासिक क्षण असे संबोधले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही बुधवारी दुपारी 12 वाजता हे विधेयक मांडलं. या विधेयकावर 6 तासांहून अधिक वेळ चर्चा केल्यानंतर रात्री 8 नंतर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. आधी चिकित्सा समितीकडे विधेयक पाठवण्यासाठी मतदान घेण्यात आलं आणि बहुमताने राज्यसभेने ही मागणी फेटाळून लावली. हे विधेयक समीक्षा समितीकडे पाठवण्याच्या विरोधात 124 मते पडली तर बाजूने 99 मते पडली. शिवसेनेने यावेळी सभात्याग केला. त्यानंतर विधेयकांवरील 14 सूचनांवर मतदान घेण्यात आलं आणि बहुतेक सूचना फेटाळण्यात आल्या. नंतर विधेयकावर अंतिम मतदान घेण्यात आलं. यावेळी विधेयक मंजूर करण्याच्या बाजूने 125 मते पडली आणि विधेयकाविरोधात 105 मतं पडली. या मतदान प्रक्रियेत एकूण 230 सदस्यांनी सहभाग घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2019 05:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading