सरन्यायाधीशांना नागपूरची चिंता, म्हणाले फक्त एवढी कामं करा

सरन्यायाधीशांना नागपूरची चिंता, म्हणाले फक्त एवढी कामं करा

सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणाले, माझा शपथविधी सोहळा दिल्लीत झाला मात्र आज मला सरन्यायाधीश झाल्यासारखे वाटले.

  • Share this:

नागपूर 18 जानेवारी : नागपूरचे सुपूत्र असलेले सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा आज नागपूरात महापालिकेच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री नितीन राऊत, अनिल देशमुख यांच्यासह शहरातले गणमान्य व्यक्ती उपस्थित होते. सर्वच मान्यवरांनी बोबडे यांच्या कामाचं भरभरून कौतुक केलं. सत्काराला उत्तर देताना सरन्यायाधीश बोबडे यांनी नागपूरच्या विकासाची आपली तळमळ व्यक्त केला आणि महापालिका आणि लोकप्रतिनिधींना काही मागण्या केल्या. या मागण्या सरन्यायाधीश म्हणून नाही तर एक नागरीक म्हणून करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणाले, माझा शपथविधी सोहळा दिल्लीत झाला मात्र आज मला सरन्यायाधीश झाल्यासारखे वाटले. ज्यावेळी आव्हान येतात त्यावेळी नागपूरकरांकडून मिळालेले सल्ले आठवतात. माझे सर्व संस्कार नागपूरात झाले. न्यायदान हे पवित्र कार्य आहे. अधिकार आहे आणि कर्तव्य नसणे हे असंतुलन आहे. मी कामाच्या व्यापातून नागपूरच्या जवळील जंगलात भटकंती केलीय. हे जंगल पर्यावर्णासाठी महत्वाचे आहे.

उद्यापासून शिर्डी बेमुदत बंद, मुख्यमंत्री तोडगा काढत नाहीत तोपर्यंत माघार नाही

फुटाळा, तेलंखडी आणि शुक्रवारी या तिन्ही तलावांचे भूमिगत प्रवाहाने जोडले आहे. हे जाळे मुबलक पाणी पुरवठा करू शकता. ही प्रणाली पूर्ववत करावी. नाग नदीच्या प्रवाहात अनेक अडथळे आहे. ती शुद्ध करून प्रवाह पूर्ववत करावा अशी विनंती त्यांनी महापालिकेला आणि लोकप्रतिनिधींना केली. ही नागरिकाची विनंती आहे न्यायाधीशाची नाही असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: nagpur
First Published: Jan 18, 2020 10:09 PM IST

ताज्या बातम्या