Home /News /maharashtra /

दिवसाची सुरुवात होण्याआधीच काळाचा घाला, अज्ञात वाहनांच्या धडकेत 2 जणांचा मृत्यू

दिवसाची सुरुवात होण्याआधीच काळाचा घाला, अज्ञात वाहनांच्या धडकेत 2 जणांचा मृत्यू

मॉर्निंग वॉकला निघालेल्या दोन तरुणांना अज्ञात वाहनाने धडक, ब्रह्मपुरी-आरमोरी मूख्य महामार्गावर ही घटना घडली.

चंद्रपूर, 09 ऑक्टोबर: काळ कधी कसा येईल सांगता येत नाही असंच काहीसं दोन तरुणांच्या बाबतीत घडलं. कोरोना काळात हळूहळू अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे आणि पुन्हा एकदा संपूर्ण सोयी-सुविधा नागरिकांसाठी खुल्या करून दिल्या जात आहेत. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात वाहनंही रस्त्यावर वाढली आहेत. मॉर्निंग वॉकला निघालेल्या दोन तरुणांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहराजवळ हा धक्कादायक प्रकार घडला. दोन तरुण मॉर्निंग वॉक करत असताना अचानक अज्ञात वाहनांनं त्यांना चिरडललं आणि यामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ब्रह्मपुरी -आरमोरी मूख्य महामार्गावर ही घटना घडली. हे वाचा-धक्कादायक VIDEO! साखळी चोरांनी चेन ऐवजी पकडला महिलेचा गळा; बाईकवरून खेचलं आणि... मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही मृत युवक खरकाडा गावातील रहिवासी होते. नेहमीप्रमाणे मुख्य महामार्गावर मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाने मागून या तरुणांना धडक दिली. दरम्यान वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत दोन्ही मृतदेह ब्रह्मपुरी उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला. दरम्यान या अज्ञात वाहनाचा शोध ब्रह्मपुरी पोलीस घेत आहेत. एकाच दिवशी खरकाडा गावातील दोन युवकांचा असे अपघाती मृत्यू परिसरातील शोकाकुल वातावरण आहे.
Published by:Kranti Kanetkar
First published:

Tags: Chandrapur

पुढील बातम्या