चंद्रपूर, 31 ऑगस्ट : राज्यावर सध्या कोरोनाची महामारी आणि मुसळधार पाऊस असं दुहेरी संकट कोसळलं आहे. अशात कोरोनाच्या महामारीत काम करणाऱ्या अनेक डॉक्टर्स ते राजकीय नेत्यांपर्यंत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. प्रत्येक राजकीय पक्षातील बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आताही चंद्रपूरचे आमदार कोरोना बाधीत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना तातडीने क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांत किशोर जोरगेवार हे विविध शासकीय बैठकांना उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या चाचणीत त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर जोरगेवार यांना तातडीने उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल केलं जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
SSR Case: आज रियाचा आणखी एक धक्कादायक चॅट उघड, CBI चौकशीत झाला मोठा खुलासा
किशोर जोरगेवार हे गेल्या काही दिवसांत कोणत्या नेत्यांना भेटले होते आणि त्यांच्या संपर्कात कोणते नेते आणि नागरिक आले होते याचा आता आरोग्य विभागाकडून शोध सुरू आहे. तर जोरगेवार यांच्या संपर्कात आलेल्यांनी आपली चाचणी करून घ्यावी अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
पिंपरीमध्ये दारू पार्टीत झाला वाद, तिघांनी डोक्यात बेसिन घालून केला मित्राचा खून
दरम्यान, 15 जुलैपासुन चंद्रपुरात कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या टेस्ंिटग सेंटरची दररोज 125 ते 200 चाचण्या करण्याची क्षमता आहे. कोविड 19 चाचण्यांचा रिपोर्ट उपलब्ध होण्याचा कालावधीही आता कमी झाला आहे.