आत्महत्या की अपघात? रायफल साफ करताना सुटली गोळी, जवानाचा मृत्यू

रायफल साफ करताना चुकून गोळी सुटून पोलीस दलातील सी सिक्स्टी जवानाचा मृत्यू झाला. सिरोंचा येथील पोलीस वसाहतीत मंगळवारी सकाळी ही घटना घडली.

News18 Lokmat | Updated On: Aug 13, 2019 01:01 PM IST

आत्महत्या की अपघात? रायफल साफ करताना सुटली गोळी, जवानाचा मृत्यू

गडचिरोली, 13 ऑगस्ट- रायफल साफ करताना चुकून गोळी सुटून पोलीस दलातील सी सिक्स्टी जवानाचा मृत्यू झाला. सिरोंचा येथील पोलीस वसाहतीत मंगळवारी सकाळी ही घटना घडली. संजय शेट्टीवार ( वय-30, रा.नरहसिंहापल्ली) असे मृत जवानाचे नाव आहे. संजय शेट्टीवार हे माओवादविरोधी पथकात तैनात होते.

मिळालेली माहिती अशी की, संजय शेट्टीवार मागील दोन वर्षांपासून सिरोंचा पोलीस स्टेशनमध्ये शीघ्र कृती पथकात कार्यरत होते. ते आपल्या कुटूंबासह सीआरपीएफ कँम्प परिसरात राहत होते. सकाळी 8 वाजता सुमारास शेट्टीवार आपली रायफल साफ करत होते. त्यातून अचानक गोळी सुटून त्यांच्या हनुवटीखालून डोक्यात घुसली. गोळी लागताच शेट्टीवर जमिनीवर कोसळले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना सिरोंचा येथील सरकारी रुग्णालयात आणण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार करून वारंगल (तेलंगणा) येथील खासगी रुग्णालयात नेताना वाटेत त्यांचा मृत्यू झाल्याचे सिरोंचा ठाण्याचे निरीक्षक शिवाजी राऊत यांनी सांगितले. दरम्यान, संज शेट्टीवार यांनी आत्महत्या केल्याची चर्चा सुरू आहे, पण हा अपघात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

उडान भरण्यापूर्वीच विमानात बिघाड...

नागपूरवरुन दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उडान भरण्यापूर्वीच तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. याच विमानाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दिल्लीला जाणार होते. सकाळी 7:30 चे इंडिगोचे विमान तांत्रिक बिघाडामुळे उशीराने जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

VIDEO: लवासा सिटीमुळे निसर्गाचा मुडदा पडला, महापुरावर बोलताना संभाजी भिडेंना अश्रू अनावर

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 13, 2019 12:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...