Elec-widget

सी-वन टायगरचा 5 महिन्यांत 1300 किमीचा प्रवास, 'या' अभयारण्यात बसवले बस्तान!

सी-वन टायगरचा 5 महिन्यांत 1300 किमीचा प्रवास, 'या' अभयारण्यात बसवले बस्तान!

तीन वर्षाचा टी-वन सी-वन वाघाने आता थेट बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य गाठले

  • Share this:

अमोल गावंडे,(प्रतिनिधी)

बुलडाणा,2 डिसेंबर: सी-वन वाघाने बुलडाण्यात जिल्ह्यातील बोथा अभयारण्यात आपले बस्तान बसवले आहे.'टिपेश्वर'च्या या वाघाने पाच महिन्यांत तब्बल 1300 किलोमीटर अंतर कापले. आता हा वाघ बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल झाला असून मागील 15 दिवसांपासून जिल्ह्यातील विविध तालुक्यात येणाऱ्या अभयारण्यात तो वावरत आहे. वनविभागाचे कर्मचारी त्याच्यावर लक्ष ठेऊन आहेत.

तेलंगाणा या राज्यातून महाराष्ट्रातील विदर्भ क्षेत्रात मोडणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात पोहोचलेल्या तीन वर्षाचा सी-वन वाघाने आता थेट बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य गाठले आहे. त्याने पाच महिन्यांत तब्बल एक हजार तीनशे किलो मीटरचा प्रवास केला आहे. यवतमाळ, नांदेड, तेलंगणा, बुलडाणामार्गे मेळघाट असा त्याने प्रवास केला असून त्याने सध्या खामगाव वन परिक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या बोथा अभयारण्यात आपले बस्तान बसवले आहे. या अभयारण्यात या वाघाच्या वास्तव्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असल्याने या ठिकाणी तो आणखी काही दिवस राहणार असलयाचे चिन्हे दिसत आहेत.

वन विभागाकडून सी वन वाघावर 27 फेब्रुवारी 2019 रोजी रेडिओ कॉलर लावण्यात आली होती. तेव्हापासून त्यावर सातत्याने नजर ठेवली जात आहे. ऑक्टोवर 19 ते 30 या काळात हा वाघ यवतमाळ जिल्ह्यातील पुसद विभागातील उमरखेड वनक्षेत्रात होता. 30 ऑक्टोबर रोजी हा वाघ यवतमाळ आणि नांदेज जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या इसापूर अभयारण्यात कॅमेऱ्यात कैद करण्यात आला होता. आता या वाघाने बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश केला आहे. चिखली आणि खामगाव परिसरात आढळल्यानंतर त्याने ज्ञानगंगा अभयारण्यात प्रवेश केल्याचे समोर आले आहे.

ज्ञानगंगा अभयारण्य हे अस्वलांसाठी प्रसिद्ध असून जैवविविधतेसह वाघाच्या खाद्यासाठी आवश्यक असलेल्या वन्यजीवाची संख्या येथे मोठ्या प्रमाणावर आहे. शिवाय वन विभागाच्या वतीने ठिकठिकाणी पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सदर वाघाचा मुक्काम या जिल्ह्यात आणखी काही दिवस राहणार असलयाची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2019 08:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...