नागपुरात एकाच रात्री तीन खून, आल्याचे पैसे मागितल्यामुळे गुंडांनी भोसकले

नागपुरात एकाच रात्री तीन खून, आल्याचे पैसे मागितल्यामुळे गुंडांनी भोसकले

एकाच रात्री तीन खून झाल्याने महाराष्ट्राची उपराजधानी हादरली आहे. खून झालेल्या व्यक्तींमध्ये प्रॉपर्टी डीलर ऋषी खोसला यांचा समावेश आहे.

  • Share this:

नागपूर, 22 ऑगस्ट- एकाच रात्री तीन खून झाल्याने महाराष्ट्राची उपराजधानी हादरली आहे. खून झालेल्या व्यक्तींमध्ये प्रॉपर्टी डीलर ऋषी खोसला यांचा समावेश आहे. नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या केडीके कॉलेजजवळ बुधवारी (21 ऑगस्ट) रात्री सैयद इम्रान सय्यद नियाज नामक तरुणाची हत्या करण्यात आली. दुसरी घटना सदर भागातील गोंडवाना चौकात घडली. प्रॉपर्टी डीलर ऋषी खोसला (वय-50) यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तर तिसरा खून दिघोरी परिसरातील सेनापतीनगरात झाला आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी विकी विजय दहाट (वय-32) या तरुणाची हत्या केली आहे.

आल्याचे पैसे मागितल्यामुळे गुंडांनी भोसकले..

मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्रनगर चौकात खरेदी केलेल्या आल्याचे पैसे मागितल्यामुळे गुंडांनी एका भाजी विक्रेत्यावर चाकूने वार केले. भाजी विक्रेत्याचा सहकारी सैयद इमरान सय्यद नियाज हा बाजूला असलेल्या पानठेल्यावर उभा होता. इमरान हा मदतीसाठी धावला असता त्याच्याही पोटात चाकू भोसकला. रक्ताच्या थारोळ्यात इमरान खाली कोसळला. मारेकरी पसार झाले. परिसरातील नागरिकांनी इमरानला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे.

तरुणीच्या घरात घुसून काढली छेड

नागपुरमध्ये गुंडांचा धुमाकूळ काही शांत होण्याची चिन्हं दिसत नाहीत. विविध गुन्ह्यांनी कायम चर्चेत राहणाऱ्या नागपुरात आणखी एक धक्कादायक घटना पुढे आलीय. दोन गुंडांनी एका तरुणीच्या घरात घुसून तिची छेड काढल्याचं प्रकरण समोर आलंय. रात्री हे दोन गुंड तिच्या घरात शिरले आणि त्यांनी तिचा विनयभंग केला अशी तक्रार पीडित तरुणीने दाखल केलीय. हे दोनही गुन्हेगार पोलिसांच्या हिटलिस्टवर असून पोलिसांचा ते सापडत नाहीत. मात्र, शहरात घुसून राजरोसपणे गुन्हे करतात यावर तीव्र चिंता व्यक्त करण्यात येतेय.

मंगेश टिचकुले व लकी तेलंग अशी या दोन गुंडांची नावं आहेत. लकी हा मंगेशचा पंटर असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. या दोघांची दक्षिण नागपुरात दहशत आहे. तरुणी घरासमोर उभी होती. त्यावेळी लकी व मंगेश तिथे आले. दोघांनी तरुणीला शिवीगाळ करून नियंभंग केला. घटना घडल्यानंतर तरुणीने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी लकी व मंगेशविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी लकी व मंगेशविरुद्ध रविवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. जवळपास एक आठवड्यानंतर हे प्रकरण उघडतीस आलं असून. लकीविरुद्ध खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मंगेश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे.याआधीही त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

VIDEO : 'राज ठाकरेंच्या बाबतीत अनुचित प्रकार घडला तर आम्ही...', मनसे नेत्याचा थेट इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 22, 2019 12:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading