Home /News /maharashtra /

भरधाव एसटी बसचा तुटला स्टेअरिंग रॉड, 23 विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशी बचावले थोडक्यात

भरधाव एसटी बसचा तुटला स्टेअरिंग रॉड, 23 विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशी बचावले थोडक्यात

धावत्या एसटी बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने बस रस्त्या खाली उतरून थेट शेतीच्या बांधला जाऊन धडकली.

    अमोल गावंडे,(प्रतिनिधी) बुलडाणा,4 जानेवारी: भरधाव एसटी बसचा स्टेअरिंग रॉड तुटून झालेल्या अपघातात 23 विद्यार्थी जखमी झाले आहे. खामगाव तालुक्यातील कोथळी गावाजवळ शनिवारी सकाळी ही घटना घडली. मलकापूर आगाराची ही बस चिचखेडनाथ येथून मोताळा येथे जात होती. धावत्या एसटी बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस रस्त्या खाली उतरून थेट शेतीच्या बांधला जाऊन धडकली. बस शेतीच्या बांधला धडकल्याने मोठा अनर्थ टळला. बसमधील 23 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहे. त्यापैकी तीन ते चार जणांना गंभीर दुखापत झाली आहे. या बसमध्ये एकूण 45 प्रवासी होते. जखमी विद्यार्थ्यांना बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोराखडी पोलिसघटनास्थळी पोहोचले आहेत. दिव्यांग शिक्षक एसटी बसच्या धडकेत जागीच ठार साखरपुड्यासाठी गावी निघालेल्या दिव्यांग शिक्षकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना बुलडाण्यात घडली आहे. बुलडाण्यावरून खामगावकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने दिव्यांग शिक्षकाचा दुचाकीला धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. बुलडाणावरून खामगाव मार्गावर दुपारी 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पद्माकर भोसले असं मृत शिक्षकाचे नाव असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. खामगाव तालुक्यातील रोहणा गावाजवळील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर बुलडाण्यावरून खामगाव मार्गे अकोलाकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने समोरून येणाऱ्या दिव्यांगाच्या तीन चाकी मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात शिक्षक पद्माकर बोचरे हे जागीच ठार झाले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दिव्यांग शिक्षकाच्या तीनचाकी दुचाकीचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव येथे हलविले आहे. शिक्षक बोचरे हे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी पिंपळगाव राजा येथून रोहणा या गावासाठी निघाले होते. परंतु, वाटेतच्या त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. बोचरे हे साखर विद्यामंदिराच्या शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. पोलिसांनी एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या