Home /News /maharashtra /

एकतर्फी प्रेमातून तरुण शिक्षिकेला चेहऱ्यावर पेट्रोल टाकून जाळलं, वाचा आणि दृष्टीही गेली

एकतर्फी प्रेमातून तरुण शिक्षिकेला चेहऱ्यावर पेट्रोल टाकून जाळलं, वाचा आणि दृष्टीही गेली

सकाळच्या सुमारास तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकतर्फी प्रेमातून तिला जाळण्यात आलं आहे.

    नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा, 03 फेब्रुवारी : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथे एका तरुण शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी शाळेमध्ये शिक्षिका आहे. तरुणीचं वय 30वर्षे असल्याची माहिती आहे. आज सकाळी 7.30 वाजता ही घटना घडली आहे. यामध्ये तरुणी 20 ते 30 टक्के भाजली असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. सकाळच्या सुमारास तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकतर्फी प्रेमातून तिला जाळण्यात आलं आहे. चेहऱ्यावर पेट्रोल ओतल्यामुळे पीडिता गंभीर जखमी झाली आहे. या भीषण हल्ल्यामध्ये तिचा चेहरा संपूर्ण जळाला असून, वाचाही गेली आणि दृष्टीदेखील गेली असल्याची खळबळजनक माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी लिकेश नगराळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सत्य काय ते अजून बाहेर यायचे आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक बसवराज तेली हिंगणघाटात दाखल झाले असून या प्रकाराने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. इतर बातम्या - 'नशा इतकी ही करू नये की नरेंद्र मोदींसारखं लग्नच करायचं नाही' नंदोरी नाक्याजवळ पीडित तरुणीच्या गावातील 2 तरुण आणि पीडिता यांच्या शाब्दिक वाद झाला. त्यानंतर तरुणांनी तिला भर रस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं. स्थानिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी पीडितेला वाचवलं आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला उपचारार्थ नागपूर येथे दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांत नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाले तर अधिक तपासातून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यात भीतीचं वातावरण आहे. पीडित शिक्षिकेला अधिकच्या उपचारासाठी नागपूरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. संपूर्ण किडणी आणि छातीपर्यंत आग गेल्यामुळे तिची स्थिती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. तर तिच्यासाठी पुढील 24 ते 48 तास अगदी महत्त्वाचे असून तिच्या जीवाला धोका असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. दरम्यान, सोशल मीडियावर पीडितेचे जळालेले फोटो व्हायरल होत आहेत. इतर बातम्या - कार्यकर्त्यांनी शिक्षिकेला दोरीने बांधून फरफटत नेलं, मारहाणीचा VIDEO व्हायरल संपूर्ण देशातून यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी चौकशी सुरू केली असून यात पीडितेची कबुली अत्यंत महत्त्वाची आहे. या प्रकरणात पोलीस पीडितेच्या कुटुंबियांचीही चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. इतर बातम्या - विधान परिषद की विधान सभा? निवडणुकीच्या प्रश्नावर पहिल्यांदाच बोलले उद्धव ठाकरे
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Maharashtra news

    पुढील बातम्या