Buldana ZP Election Result: निवडणुकीआधीच भाजपने सोडलं मैदान, महाविकास आघाडीची सत्ता

Buldana ZP Election Result: निवडणुकीआधीच भाजपने सोडलं मैदान, महाविकास आघाडीची सत्ता

बहुमत नसल्याने भाजपच्या दोनही उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली.

  • Share this:

बुलडाणा 08 जानेवारी : बुलढाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या मनिषा पवार या अध्यक्षपदी विराजमान झाल्या असून उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या कमल बुधवत यांची निवड बिनविरोध निवड झालीय. प्रतिस्पर्धी भाजपकडून अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी दाखल करण्यात आलेले दोन्ही अर्ज मागे घेण्यात आल्यामुळे महाविकास आघाडीच्या अध्यक्ष उपाध्यक्षांची बिनविरोध निवड झालीय. बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेस तर्फे जानेफळ जिल्हा परिषद गटातील मनिषा पवार यांनी तर शिवसेनेतर्फे कमल बुधवत यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

भाजपतर्फे अध्यक्षपदासाठी जामोद जिल्हा परिषद गटातील रुपाली अशोक काळपांडे यांचा तर उपाध्यक्षपदासाठी जयश्री विनोद टिकार यांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. दुपारी एक वाजता दोघांनीही अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणुक बिनविरोध झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या विशेष सभेचे पिठासीन अध्यक्ष म्हणून बुलडाण्याचे उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यांनी काम पाहिले.

महाविकास आघाडी भाजपला सत्तेतून खाली खेचण्याच्या इराद्याने या निवडणुकीत उतरली होती. भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने भाजप प्रारंभीच बॅकफुटवर गेलेली आहे. एकूण ६० सदस्यांपैकी महाविकास आघाडीतील काँग्रेसचे १४, शिवसेनेचे ११ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ सदस्य असून भारीप-बमसचाही पाठींबा महाविकास आघाडीला आहे.

'भाजपचे राज ठाकरेंसोबत युतीचे संकेत, काँग्रेसचा मंत्रीच घडवेल राजकारणात भूकंप'

सलील देशमुख यांची एन्ट्री

महाविकास आघाडीमुळे जवळपास सर्वच ठिकाणी समिकरणं बदलली असून काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्याने बरीच उलथापालथ झालीय. अनेक ठिकाणांची समिकरणं बदलली आहेत. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना राज्यात अनपेक्षीतपणे गृहमंत्रीपद मिळालं. त्यामुळे त्यांची लॉटरी लागल्याचं बोललं जातंय. खातेवाटपात मोठं यश मिळाल्यानंतर आता त्यांचा मुलगा सलील देशमुख हा विजयी झालाय. त्यामुळे देशमुखांचा डबल धमाका झाला असून काही वर्ष मागे पडल्यानंतर देशमुख आता पुन्हा स्पर्धेत आले आहेत.

अमित ठाकरेंच्या आधी आणखी एका दिग्गज नेत्याच्या मुलाची राजकारणात दमदार एन्ट्री

सलील देशमुख नागपुरातील मेटपांजरा मधून विजयी झाले आहेत. नागपूर जिल्हा परिषद सदस्य म्हणून सलील देशमुख पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांचा हा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश समजला जातोय. अनिल देशमुख यांनी सलीलला विधानसभेत तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न केले होते. पण त्यात त्यांना यश आलं नाही. बदलत्या राजकीय परिस्थितीत सलील यांना जिल्हा परिषदेच्या आखाड्यात उतवून त्यांनी विजय खेचून आणलाय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित हा 23 जानेवारीला राजकारणात सक्रिय प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. त्या आधीच राज्याच्या राजकारणात एका दिग्गज नेत्याच्या मुलाची दमदार एन्ट्री झालीय.

Published by: Ajay Kautikwar
First published: January 8, 2020, 4:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading