Home /News /maharashtra /

धक्कादायक! परीक्षेत पास पण आयुष्याशी हारला, भावाच्या वाढदिवसाला संपवलं जीवन

धक्कादायक! परीक्षेत पास पण आयुष्याशी हारला, भावाच्या वाढदिवसाला संपवलं जीवन

विघ्नेश हा अतिशय हुशार विद्यार्थी होता. त्याला 10 वीच्या परीक्षेत 98 टक्के गुण मिळाले होते.

वाशिम, 16 जुलै : उराशी क्लास वन अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्याने केवळ 12 वीच्या परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना धनज खुर्द इथं घडली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे आजच त्याचा मोठा भाऊ प्रथमेश टेकाडेचा वाढ दिवस असल्यानं तो सकाळी खुप आनंदित होता. धनज खुर्द इथल्या विघ्नेश संतोष टेकाडे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. विघ्नेश हा अतिशय हुशार विद्यार्थी होता. त्याला 10 वीच्या परीक्षेत 98 टक्के गुण मिळाले होते. त्याने भविष्यात क्लास वन अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगत 11 वीच्या विज्ञान शाखेत अमरावती इथल्या एका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्याने शिकण्यासाठी जिद्द आणि प्रचंड परिश्रम घेतले. तल्लख बुद्धीचा असल्याने शिक्षकांच्या ही आज्ञेत कायम राहायचा. त्यानं परीक्षेची जय्यत तयारी ही केली होती. भयानक! या देशात लॉकडाऊन न पाळणाऱ्यांचा थेट होतो मर्डर, 8 लोकांचा मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार, विघ्नेशला सर्व पेपरही चांगले गेले होते. परिक्षेनंतर विघ्नेश हा आपल्या मूळ गांवी धनज येथेच आला होता. त्यामूळे दररोज शेतामध्ये जाण्याचा त्याचा नित्यक्रम झाला. आज ही तो सकाळी शेतात गेला होता. 12 विचा निकाल असल्यानं विघ्नेश सकाळपासूनच निकालाची वाट पाहत होता. जेव्हा निकाल लागला तेव्हा त्याला कदाचित धक्का बसला असावा कारण त्याला 12 वीच्या परीक्षेत केवळ 68.15 टक्के गुण मिळाले आहेत. मोबाईलवर निकाल पाहून अपेक्षित निकाल न लागल्याने हताशेपोटी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता कुटुंबियांनी वर्तविली आहे. विघ्नेशचा मोठा भाऊ प्रथमेश मोबाईलवर वारंवार कॉल करत होता. मात्र, तो कॉल उचलत नसल्यानं त्याचा भाऊ शेतात गेला असता विघ्नेशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं. लॉकडाऊनमुळे गटारीच्या दिवशी मटण दिवसभर मिळणार का? अतिशय गुणी आणि सुस्वभावी असलेल्या विघ्नेश टेकाडेने ऐन उमेदीच्या काळात आत्महत्या केल्यानं हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे विघ्नेशचा मोठा भाऊ प्रथमेशचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे त्याने सकाळीच वाढदिवसाचे स्टेटस ठेवले होते आणि तो भावाचा वाढदिवस आणि 12 विचा निकाल लागणार असल्यानं अतिशय आनंदीत होता. मात्र 12 वीच्या परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्याने खचून गेलेल्या विघ्नेशने आत्महत्या करून सर्व आनंदावर विरजण पाडले.
Published by:Renuka Dhaybar
First published:

पुढील बातम्या