दुर्दैवी! पतंगाचा पाठलाग करणाऱ्या मुलाचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू

दुर्दैवी! पतंगाचा पाठलाग करणाऱ्या मुलाचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू

पतंग (Kite) पकडण्यासाठी जगाचं भान विसरुन धावणाऱ्या एका बारा वर्षाच्या मुलाचा रेल्वेच्या (Train) खाली चिरडून मृत्यू झाला आहे.

  • Share this:

नागपूर, 7 जानेवारी :  पतंग (Kite) पकडण्यासाठी जगाचं भान विसरुन धावणाऱ्या एका बारा वर्षाच्या मुलाचा रेल्वेच्या (Train) खाली चिरडून मृत्यू झाला आहे. एंटा सोळंकी असं या मृत मुलाचं नाव आहे. एंटा पंतग पकडण्याच्या नादात रेल्वे ट्रॅक ओलांडत होता. त्यावेळी त्या ट्रॅकवरुन रेल्वे येत असल्याचं त्याच्या लक्षात आलं नाही, आणि ही चूक त्याला महागात पडली.

आजीचा होता आधार!

नागपूरच्या (Nagpur) कोराडी परिसरातील शिवकृष्ण धाम झोपडपट्टीजवळ ही घटना घडली. एंटाच्या वडिलांचा पाच वर्षांपूर्वी रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. त्यानंतर त्याची आई त्याला सोडून गेली. एंटा त्याच्या आजीसह राहत होता. त्याची आजी भीक मागून एंटाचं पालपोषण करत होती.

एंटा मंगळवारी दुपारी जेवल्यानंतर घराबाहेर खेळण्यासाठी बाहेर पडला होता. त्यावेळी त्याला रेल्वे ट्रॅकच्या पलिकडे कटलेला पतंग दिसला. तो पतंग इतर कुणाला दिसण्याच्या आत पकडण्याच्या धुंदीत तो धावला. लवकर धावत जावून पतंग पकडण्याची त्याच्यावर इतकी धुंदी चढली होती की, त्याला रेल्वेचा आवाज ऐकू आला नाही. रेल्वे ट्रॅकच्या जवळ एका बांधकामाच्या ठिकाणी काही मजूर काम करत होते. त्यांनीही एंटाला ओरडून सावध करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचं त्या आवाजाकडंही लक्ष नव्हतं. एखादा मजूर धावत जावून एंटाला थांबवण्याच्या आत हा अपघात घडला. या प्रकरणात पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. एंटावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

आठवडाभरातील दुसरी घटना

नागपुरात पतंगाच्या नादात गेल्या आठवभरातील हा दुसरा बळी आहे. यापूर्वी नागपूरच्या MIDC परिसरात पतंग पकडण्याच्या नादात रस्ता क्रॉस करणाऱ्या मुलाचा कारची धडक लागून मृत्यू झाला होता.

Published by: News18 Desk
First published: January 7, 2021, 9:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading