भाजपच्या या नवनिर्वाचित आमदारांचे फ्लेक्स फाडले, तक्रार दाखल

भाजपच्या या नवनिर्वाचित आमदारांचे फ्लेक्स फाडले, तक्रार दाखल

सलग 3 टर्म आमदार असलेल्या काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांचा पराभव झाला.

  • Share this:

संजय शेंडे,(प्रतिनिधी)

अमरावती,2 नोव्हेंबर: अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात अज्ञात व्यक्तीने भाजपचे नवनिर्वाचित आमदार प्रताप अडसड यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स फाडल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच सलग 3 टर्म आमदार असलेल्या काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांचा भाजपचे उमेदवार प्रताप अडसड यांनी पराभव केला. अशातच चांदूर रेल्वे शहरात भाजप कार्यकर्त्यांनी प्रताप अडसड हे विजयी झाल्याबद्दल त्यांना अभिनंदन व दिवाळीच्या शुभेच्छांचे जवळपास 10 फ्लेक्स लावले होते. सदर फ्लेक्स रात्री अज्ञात व्यक्तीने फाडले. ही बाब शनिवारी उघडकीस येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. भाजप कार्यकर्त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

'देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी काकूंची मोर्चेबांधणी!

विधानसभांचे निकाल लागल्यानंतर भाजपला अपेक्षीत संख्याबळ गाठता आलं नाही. राजकारणात संख्याबळ नसेल तर शक्ती कमी होते याचा गेल्या पाच वर्षांचा अनुभव पाठिशी असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकाल लागत असतानाच अपक्ष म्हणून बंडखोरी करत विजय मिळवलेल्या उमेदवारांना संपर्क करायला सुरुवात केली होती. याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनीच निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली होती. भाजप आणि शिवसेनेला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्यानंतरही संख्याबळ वाढविण्यासाठी भाजपने खास रणनीती आखली आहे. प्रत्येक अपक्षाला ठरवून संपर्क केला जात असून जास्तित जास्त संख्या जमविण्याचा मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमचा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीसांचं बळ वाढावं यासाठी आता त्यांच्या काकू आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांनीही मोर्चेबांधणी सुरू केलीय.

शोभाताई फडणवीस यांनी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची आज सकाळी भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या. सकाळी शोभाताई जोरगेवार यांच्या घरी गेल्या आणि त्यांचं अभिनंदन केलं. जोरगेवार हे कुठल्या पक्षात नसले तरी त्यांची भाजपसोबत जवळीक होती. त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. शोभाताईंनी जोरगेवार यांना भाजपचं तिकीट मिळावं यासाठी खूप प्रयत्न केले होते. मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही त्यामुळे त्यांनी चंद्रपूरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकलीही.

भेटीनंतर शोभाताईंनी कुठलीही प्रतिक्रीया दिली नाही. मात्र त्यांची ही भेट जोरगेवार यांचा पाठिंबा मिळविण्यासाठीच होती अशी माहिती सूत्रांनी दिलीय. जोरगेवारही भाजपला पाठिंबा देतील अशी शक्यताही व्यक्त केली जातेय. जिरगेवार यांनी भाजपचे 2 वेळा आमदार राहिलेले नाना शामकुळे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

First published: November 2, 2019, 10:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading