अमित शहांचा काँग्रेस-NCPवर हल्लाबोल, हे आहेत भाषणातले 10 महत्त्वाचे मुद्दे

अमित शहांचा काँग्रेस-NCPवर हल्लाबोल, हे आहेत भाषणातले 10 महत्त्वाचे मुद्दे

'काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाराष्ट्राला खड्ड्यात घातलं. अजित पवार यांनी 70 हजार कोटी खर्चून मोठा घोटाळा केला त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल.'

  • Share this:

किशोर गोमासे, वाशीम 11 ऑक्टोंबर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा महाराष्ट्रात असून काँग्रेस-राष्ट्रवादीवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. शुक्रवारी वाशीममध्ये झालेल्या जाहीर सभेत त्यांनी 'आघाडी'च्या धोरणांवर जोरदार टीका केली. काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत असताना त्यांनी महाराष्ट्राला खड्ड्यात घातलं. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आज प्रगतिपथावर आहे. विकासाच्या गाडीचा वेग असाच कायम ठेवायचा असेल तर देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्रच पाहिजे असंही ते म्हणाले. पाकिस्तान आणि कलम 370 वर राहुल गांधी आणि शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही त्यांनी केली.

लोकांना मूर्ख बनवू नका, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

अमित शहांच्या भाषणातले 10 महत्त्वाचे मुद्दे

काँग्रेस ने व्होट बँकेसाठी 370 हटवलं नाही. शरद पवार व राहुल गांधी हे 370 शी सहमत आहेत की नाही हे त्यांनी जनतेला सांगितलं पाहिजे.

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. तो भारतापासून कोणीही वेगळा करू शकत नाही. भारताचं नेतृत्व सध्या एका मजबूत नेतृत्वाच्या हातात आहे.

काँग्रेसला देशाची चिंता नाही तर व्होट बॅंकेची चिंता आहे.राहुल बाबा देशातील प्रत्येक व्यक्ती काश्मीरसाठी जीव द्यायला तयार आहेत हे लक्षात ठेवा.

राष्ट्रावादी आणि काँग्रेसचे नेते घुसखोरांना हाकलू देत नाहीत. मात्र मी 2024 पर्यंत प्रत्येक घुसखोराला हाकलणार आहे.

...जेव्हा भाजपचेच नेते म्हणतात 'कमळा' ऐवजी 'घड्याळा'चं बटन दाबा!

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाराष्ट्राला खड्ड्यात घातलं. अजित पवार यांनी 70 हजार कोटी खर्चून मोठा घोटाळा केला त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल.

फडणवीस यांनी महाराष्ट्र्राला पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवलं. नरेंद्र व देवेंद्र यांची परत जोडी बनवा.

समृद्धी मार्गामुळे वाशिम जिल्ह्याचा मोठा विकास होणार. वाशिममध्ये मध्यवर्ती विद्यापीठास मंजुरी दिली जाणार आहे.

फडणवीस सरकारने  शेतकऱ्यांना शास्वत वीज पुरवठा केला. विदर्भातील 16 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं.

सर्व कामं आम्ही तुमच्या आशीर्वादामुळे करू शकलो. मोदींनी जगात देशाचं मोठं नाव केलं. मोदी याचं नाही तर विदेशात 125 कोटी जनतेचं स्वागत होत आहे

फडणवीस यांनी राज्यात सव्वा लाख कोटींची कामं केली आहेत. त्यामुळे आम्हाला मोठ्या मतांनी निवडून द्या.

First published: October 11, 2019, 3:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading