भाजपच्या आमदाराची मुजोरी, जेसीबी चालकाला केली मारहाण

भाजपच्या आमदाराची मुजोरी, जेसीबी चालकाला केली मारहाण

योग्य पद्धतीने काम केलं नाही अशी विचारणा आमदारांनी केली, त्याला योग्य उत्तर न मिळाल्यामुळे त्यांचा पारा चढला आणि त्यांनी मारहाण केली.

  • Share this:

भास्कर मेहेरे, यवतमाळ 13 सप्टेंबर : भाजपचे वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी एका जोसीबी चालकाला मारहाण केल्याची घटना पुढे आलीय. नाली खोदल्यानंतर ती बुजविण्याच्या कारणावरून आमदाराने केली मारहाण केली असा आरोप पीडीत चालकाने केलाय. सन्नी तेंभरे असं मारहाण झालेल्या युवकाचं नाव आहे. तो गोंदिया जिल्ह्यातला रहिवासी असून वणी तालुक्यातील शिरपूर गावाजवळ जेसीबीने काम करायला आला होता. आमदारा विरुद्ध तक्रार देण्यास शिरपूर पोलीस ठाण्यात दाखल, मात्र पोलिसांनी अजूनही तक्रार दाखल करून घेतली नाही. असा आरोप मारहाण झालेल्या युवकाने केलाय. शिरपूर गावाजवळ जेसीपीच्या साह्याने काही काम सुरू असल्याने नाली खोदण्यात आली होती. मात्र मारहाण केल्याचा आ्ररोप आमदार बोदकुरवार यांनी फेटाळून लावलाय. आपण फक्त त्याला दमदाटी केली असा दावा त्यांनी केलाय.

ही नाली योग्य पद्धतीने बुजवण्यात आली नव्हती. काम करताना रस्ता पुन्हा पुर्ववत करावा अशी अट कंत्राटदाराला घातलेली असते. मात्र त्याचं पालन केलं जात नाही. त्यामुळे रस्त्यात खड्डे पडतात. यावरून आमदार बोदकुरवार यांनी चालकाकडे विचारणा केली. मात्र त्याने योग्य उत्तर न दिल्याने आमदार भडकले आणि त्यांनी चालकाला मारहाण केली.

गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरीला गेला मोबाइल, तरुणाने केली आत्महत्या

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर तरुणीने फेकला शाईचा फुगा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला शुक्रवारी नगरमधून सुरू झाली. त्याचदरम्यान एका तरुणीचा उद्रेक झाला. तिने 'सीएम गो बॅक'च्या घोषणा देत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीवर शाईचा फुगा फेकल्याचा दावा केला आहे. धक्कादायक म्हणजे तरुणी गाड्याच्या ताफ्याच्या विरुद्ध दिशेला धावत सुटल्याची माहिती मिळाली आहे. शर्मिला येवले असे या तरुणीचे नाव असून ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकर्ता असल्याचे समजते.

'मनसे' निवडणूक लढविणार की नाही सस्पेंन्स कायम, राज ठाकरे घेणार अंतिम निर्णय

सरकारचं महापोर्टल बंद करावं, पिचडांना उमेदवारी देऊ नये, राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, ही मागणी करत अकोले येथे शर्मिली येवले या तरुणीने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्र्यांचा मुख्य ताफा येण्याच्या अगोदर पुढे असलेल्या वाहनावर तिने निळी शाई फेकण्याचा प्रयत्न केला. ताफा निघून गेल्यानंतर पाच मिनिटांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अकोले येथे सभेच्या ठिकाणी दाखल झाला. पोलिसांनी अद्याप संबंधित तरुणीवर कोणतीही कारवाई केली नाही. तिने फेकलेली शाई रोडवर पडलेली दिसत होती. तिच्या मागण्या रास्त असतील, मात्र पद्धत चुकीची वाटते.तिचा अपघात होऊ शकला असता, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

First published: September 13, 2019, 5:35 PM IST
Tags: BJPBJP MLA

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading