मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात भाजपलाच धक्का? हे आमदार बंडखोरीच्या तयारीत

कार्यकर्ता हरला आणि मित्र जिंकला. कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा निर्णय घेऊ असे संकेतही त्यांनी दिलेत. त्यामुळे कोहळे हे बंडाच्या पावित्र्यात आहेत असं बोललं जातंय.

News18 Lokmat | Updated On: Oct 1, 2019 09:55 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात भाजपलाच धक्का? हे आमदार बंडखोरीच्या तयारीत

नागपूर 01 ऑक्टोंबर : मुख्यमंत्र्यांचं गाव आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरातच भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. दक्षिण नागपूरचे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांना यावेळी पक्षाने तिकीट नाकारलंयय. त्यामुळे कोहळे नाराज आहेत. आज त्यांच्या घरासमोर समर्थक कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. यावेळी कार्यकत्यांसमोर बोलताना कोहळे यांनी बंडखोरी करण्याचे स्पष्ट संकेत दिलेत. ते म्हणालेत. कार्यकर्ता हरला आणि मित्र जिंकला. कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा निर्णय घेऊ असे संकेतही त्यांनी दिलेत. त्यामुळे कोहळे हे बंडाच्या पावित्र्यात आहेत असं बोललं जातंय.

भाजपने केलेल्या सर्व्हेत कोहळे यांच्याबद्दल अनुकूल मत नसल्याने त्यांना तिकीट नाकारण्यात आलं असं बोललं जातंय. पण त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. फक्त नागपुरातच नाही तर राज्यात अनेक ठिकाणी तिकीट नाकारल्या गेल्याने भाजपचे नेते बंडाच्या तयारीत आहेत.

भाजपच्या खेळीमुळे पुण्यात सेना 'उणे', कार्यालयाला टाळं लावून 'मातोश्री'वर!

कोथरूड

कोथरूडची निवडणूक यंदा लक्षवेधी ठरणार आहे. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी पक्की झाली आणि भाजपात धुसफूस सुरू झाली. विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्यात. इतर इच्छुक नाराज असले तरी तसं ते दाखवत नाहीत. कोथरूड चे माजी शिवेसेना आमदार चंद्रकांत मोकाटे अपक्ष म्हणून शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने ही जागा मित्र पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिलीय. पाटील यांच्या विरुद्ध विरोधीपक्ष एकच उमेदवार देण्याचीही शक्यता आहे.

Loading...

गुहागर

गुहागर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडून उमेदवारी अर्ज घेतला. खबरदारी म्हणून निवडणुक अर्ज घेतल्याचं भाजप कार्यकर्त्यांनी सांगितलं. वरिष्ठ पातळीवरून कोणतीही  सूचना न आल्यामुळे गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू विधानसभा मतदार संघातून  गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. विनय नातू यांच्या भूमिकेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीय.

मुख्यमंत्री फडणवीस यांना SCकडून धक्का; ऐन विधानसभा निवडणुकीत दाखल होणार खटला!

ठाणे

भाजपला ठाणे शहर मतदारसंघ दिल्यास शिवसैनिक भाजप उमेदवारासाठी काम करणार नाहीत असा इशारा ठाण्यातल्या आनंद मठात जमलेल्या शिवसैनिकांनी दिलाय. यावेळी शिवसैनिकांनी भाजपाविरोधात घोषणाबाजीही केलीय. त्यामुळे शिवसेनेचा गढ असलेल्या या भागात भाजपला प्रसारासाठी जागा देऊ नका असं शिवसेनेला वाटतंय.

लोहा

लोहा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याने भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मोठा धक्का बसलाय. लोहा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडून भाजपला मिळेल अशी त्यांना आशा होती. त्या जागेवर आपल्याला मुलाला तिकीट देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र लोहा ही जागा शिवसेनेकडेच कायम असून तिथे उमेदवारही त्यांनी निश्चित केलाय. त्यामुळे संतापलेल्या चिखलिकर यांनी शिवसेनेला धडा शिकविण्याची थेट धमकीच दिलीय.

पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का, काँग्रेसचाच 'हा' नेता देणार त्यांना टक्कर

खासदार प्रताप पाटिल चिखलीकर हे 2019 पर्यंत शिवसेनेचेच आमदार होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला आणि खासदारही झाले. याचा शिवसेनेला राग आल्याचं बोललं जातं. चिखलीकर यांनी सेनेशी गद्दारी केल्याने त्यांना धडा शिकविण्यासाठी सेनेने हट्टाने हा मतदारसंघ आपल्याकडेच ठेवला. शिवसेनेकडून लोह्यात मुक्तेश्वर धोंडगे यांचं तिकीट निश्चित मानलं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: nagpur
First Published: Oct 1, 2019 09:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...