मोफत 'मिक्सर'ची भाजप आमदाराची घोषणा बेतली महिलांच्या जीवावर

मोफत 'मिक्सर'ची भाजप आमदाराची घोषणा बेतली महिलांच्या जीवावर

या महिलांना साधं पिण्याचं पाणीही उपलब्ध होऊ शकलं नाही. त्यातच तीव्र ऊन आणि मंडपात झालेल्या गर्दीनं जीव कासावीस होऊन सुमारे 25 वर महिला चक्कर येऊन कोसळल्या.

  • Share this:

हैदर शेख, चंद्रपूर 16 ऑगस्ट : चिमुरमध्ये रक्षाबंनाचा भाजप आमदाराचा कार्यक्रम त्यांच्या अंगलट आला आणि महिलांच्या जीवावर बेतला. भाजपचे आमदार कीर्ती भंगडिया यांनी रक्षाबंधना निमित्त महिलांना मोफत मिक्सर देण्याची घोषणा केली होती. कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. फुकट गोष्टी सगळ्यांनाच हव्या असल्याने या कार्यक्रमाला महिलांची प्रचंड गर्दी झाली. तब्बल 40 हजार महिला जमल्याचा दावा करण्यात येतोय. मात्र कार्यक्रम स्थळी गैर नियोजन असल्यानं गर्मी आणि गर्दीमुळे  महिलांना भोवळ यायला लागल्या आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला.

नाशिक बाजार समितीला ग्रहण, सभापतीला लाच घेताना अटक

चिमूर मतदारसंघातील महिलांना आज मिक्सर भेट देण्याची घोषणा भंगडियांनी केली होती. चिमूर क्रांती दिनानिमित्त हा रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यासाठी प्रमुख अतिथी म्हणून अमृता फडणवीस यांची उपस्थिती होती. कार्यक्रम दुपारी 3 वाजताच्या सुमारास सुरू झाला. मात्र तालुक्यातील महिला सकाळी नऊ वाजेपासून कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचल्या. पाहता-पाहता 40 हजारांवर महिला इथं मिक्सरच्या अपेक्षेने उपस्थित झाल्यानं आमदार भांगडीयाचं नियोजन पूर्णपणे ढेपाळलं.

राष्ट्रवादीला धक्का देत विधानसभेआधी धनराज महालेंचा शिवसेनेत प्रवेश

या महिलांना साधं पिण्याचं पाणीही उपलब्ध होऊ शकलं नाही. त्यातच तीव्र ऊन आणि मंडपात झालेल्या गर्दीनं जीव कासावीस होऊन सुमारे 25 वर महिला चक्कर येऊन कोसळल्या. त्यांना लगेच ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. मात्र, या प्रकारानं कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला. हा सगळा प्रकार अमृता फडणवीस येण्यापूर्वी घडला. पण गर्दी जमवण्याचा नादात आमदार भंगडियांनी केलेला हा प्रयत्न लोकांच्या जीवावर बेतला असता. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयानं 15 महिला दाखल झाल्या असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 16, 2019, 5:27 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading