गडकरी घेणार सरसंघचालकांची भेट, सत्तास्थापनेचा पेच सोडविण्यासाठी संघ 'दक्ष'

गडकरी यांचे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे कोंडी फोडण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो असं संघाला वाटतं.

News18 Lokmat | Updated On: Nov 6, 2019 07:59 PM IST

गडकरी घेणार सरसंघचालकांची भेट, सत्तास्थापनेचा पेच सोडविण्यासाठी संघ 'दक्ष'

नागपूर 6 नोव्हेंबर : महाराष्ट्रात निर्माण झालेला सत्तास्थापनेचा पेच सोडविण्यासाठी राष्ट्रीय स्वंयंसेवक संघ 'दक्ष' झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार आहेत. गडकरी हे उद्या गुरूवारी (7 नोव्हेंबर) नागपूरला जाणार असून संघाच्या एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी ते संघ मुख्यालयात जाणार असून तिथेच त्यांची आणि मोहन भागवतांची भेट होणार आहे. महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा जो पेच निर्माण झालाय त्यावर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. भाजपमध्येही सरसंघचालकांचा शब्द हा अंतिम मानला जातो. त्यामुळे ते नितीन गडकरींना काय संदेश देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

'शिवसेना युतीतून बाहेर पडत नाही, तोपर्यंत यावर तोडगा नाही'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भागवतांची भेट घेतल्यानंतर ते महायुतीचं सरकार बनावं यासाठी अनुकूल असल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. आता गडकरी यांना सरसंघचालक काय सल्ला देतात ते महत्त्वाचं ठरणार आहे. गडकरी हे सोमवारपर्यंत नागपूरातच राहणार आहेत.  गेल्या 10 दिवसांपासून निर्माण झालेला हा पेच सोडविण्यासाठी आता गडकरी पुढाकार घेण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय. गडकरी यांचे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे कोंडी फोडण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो असं संघाला वाटतं.

मुख्यंत्र्यांच्या भेटीत काय झालं?

शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला. मंगळवारी सत्तेचा हा वाद सरसंघचालकांच्या दारात पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. मुंबईतील बैठक आटोपून मुख्यमंत्री फडणवीस थेट नागपूरला रवाना झाले. संध्याकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर इथल्या मुख्यालयात पोहोचले. यावेळी त्यांनी मोहन भागवत यांची भेट घेतली होती.

Loading...

शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीला एकनाथ खडसेंचा पाठिंबा?

दरम्यान, त्याआधी दिल्लीतून परत आल्यानंतर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर भाजपने मुख्यमंत्री फडणवीसच होणार हे स्पष्टपणे बजावलं आहे. तसंच सेनेला जेरीस आणण्यासाठी भाजपनं प्लॅन बी तयार केला आहे.त्यानुसार 2014 प्रमाणेच शपथविधी उरकून नंतर सेनेची कोंडी करण्याची तयारी भाजप करत असल्याचं समजतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2019 07:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...