'सामना'वरून भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, केली बोचरी टीका

'सामना'वरून भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, केली बोचरी टीका

'तुमचा "आरसा" तुमच्या समोर आम्ही आज धरला....मग "सामना"ची बातमी दाखवली म्हणून इतका का राग आला?'

  • Share this:

नागपूर 17 डिसेंबर : विधानसभेत आज रणकंदन माजलं. भाजप आणि शिवसेनेचे सदस्य आपसात भिडल्याने वातावरण चांगलंच तापलं होतं. शेवटी विधानसभा अध्यक्षांना आपल्या दालनात बैठक घेऊन परिस्थिती शांत करावी लागली. भाजप आणि शिवसेनेचं भांडण मुद्यावरून गुद्यावर आल्याने परिस्थिती चिघळली. सावरकरांच्या मुद्यावरून वाद घातल्यानंतर भाजपने आज शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीचा मुद्दा उपस्थित केला. ज्या घोषणा तुम्ही आधी केल्या आहेत त्याची आता अंमलबजावणी करा अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली होती. भाजपच्या सदस्यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेलं सामनाही सभागृहात झळकवलं होतं. त्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली होती. आम्ही सामना वाचत नाही असं जे सांगत होते तेच आज सामना हातात घेऊन सभागृहात आलेत. त्यांना सामनाची दखल घ्यावी लागली. त्यांनी आधीच सामना वाचला असता तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती अशी टीका ठाकरेंनी केली होती.

उगाच इथं बोंबलू नका, केंद्राकडे पैसे मागा; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावलं

काय म्हणाले शेलार?

भाजपने आमदार आशीष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना उत्तर दिलंय. आम्ही फक्त आरसा दाखवला त्यामुळे तुमचा खरा चेहरा जगासमोर उघड झाला अशी टीका त्यांनी ट्विटरवरून केलीय.

शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करु.. असे तुम्हीच म्हणाला होतात

तुमचा "आरसा" तुमच्या समोर आम्ही आज धरला....

मग "सामना"ची बातमी दाखवली म्हणून इतका का राग आला?

तुम्ही जे बोलला होतात तेच तर ठळक करुन आम्ही दाखवले...

तुम्हचेच फसवे चेहरे तर नाही ना त्यामुळे सभागृहात समोर आले?

शिवसेना-भाजपमधील राजकीय संघर्ष भडकणार, औरंगाबादमध्ये उमटणार पडसाद

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

नागपूर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना बघायला मिळाला. सावरकरानंतर आता भाजपने शेतकऱ्यांच्या मुद्यावरून विधानसभा डोक्यावर घेतली. सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये भर सभागृहातच हाणामारी झाल्याने वातावरण आणखी चिघळलं. नंतर अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या दालनात बैठक बोलावली आणि वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. नंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचा शेतकऱ्यांचा कळवळा हा खोटा आहे. भाजपने उगाच इथे बोंबलू नये केंद्राकडे जाऊन पैसै मागावे असं त्यांनी भाजपला सुनावलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, हे या सरकारचं पाहिलं अधिवेशन आहे. सभागृहचं कामकाज जग बघतं. माझी दोन्ही पक्षांना विनंती सभागृहाच्या इतिहासाला काळिमा फसू नका.

भाजप आमदारासोबत धक्काबुक्की करणाऱ्या शिवसेना आमदाराची पहिली प्रतिक्रिया

फक्त विरोधी पक्ष आहे सत्तारूढ पक्षला काही देणं घेणं नाही हे चित्र उभे करण्याचा प्रयत्न होतोय. शेतकऱ्यांना वचन दिलंय ते आम्ही पाळणार. फक्त बोंबल्ल्याने प्रश्न मार्गी लागत नाहीत असंही त्यांनी सुनावलं. आम्ही सामना वाचत नाही म्हणाऱ्यांना सामना हातात घेण्याची वेळ आलीय. आधी सामना वाचला असता तर विरोधात बसले नसते. चोरून सामना वाचण्यापेक्षा उघडपणे सामना वाचला असता तर आज सामना करायची गरज नसती. पूरग्रस्तांसाठी 7 हजार आणि अवकाळी पावसासाठी 7 हजार कोटी केंद्राकडे मागितले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 17, 2019 06:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading